#CabinetExpansion | केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार! या आहेत १० महत्त्वपूर्ण घडामोडी

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

१. संध्याकाळी ६ वाजता होणार नव्या केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी. राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग. शपथविधी कार्यक्रमाचं पत्रक व्हायरल

२. केंदीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचं मंत्रिपद काढून घेण्याच आल्याचं वृत्त आहे. प्रकृतीच्या कारणामुळे आता शिक्षण खातं नव्या चेहऱ्याकडे सोपवलं जाणार असल्याचं वृत्त आहे.

३. रमेश पोखरिया यांच्यासोबत संतोष गंगवार, देवोश्री चौधरी, सदानंद गौडा यांचीही नावं नव्या मंत्रिमंडळात नसतील. त्यामुळे या चेहऱ्यांऐवजी नव्या कोणत्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार यावरुन चर्चांना उधाण आलंय.

४. खासदार नारायण राणे यांनाही दिल्लीत बोलावणं आलं होतं. दरम्यान, त्यांचं नाव केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असून त्यांना अवजड खातं दिलं जाण्याची चर्चा आहे.

५. महाराष्ट्रातून नारायण राणेंसोबत, कपिल पाटील, भागवत कराड, हिना गावित, रणजीत नाईक-निंबाळकर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

६. आतापर्यंत कोणकोणते मंत्री पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले आहे, त्याची ही यादी..

1.    ज्योतिरादित्य सिंधिया 
2.    सर्वानंद सोनोवाल 
3.    अजय भट्ट 
4.    कपिल पाटिल 
5.    शांतनु ठाकुर 
6.    पशुपति पारस 
7.    नारायण राणे 
8.   मीनाक्षी लेखी 
9.    शोभा करांडलजे 
10.   अनुप्रिया पटेल 
11.   हिना गावित 
12.   अजय मिश्रा
13.   सुनीता दुग्गल
14.   भागवत कराड
15.   भारती पवार
16. राजीव चंद्रशेखर
17.  वीरेंद्र कुमार
18.  एसपी बघेल

७. काही मंत्र्यांना प्रमोशनही दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यांचाही शपथविधी आज संध्याकाळी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

८. अनुराग ठाकुर, जी. किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला यांना कॅबिनेटमध्ये बढती दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

९. २०२२मध्ये गोव्यासह 6 महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तारातील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

१०. २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नवी टीम तयार करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाच्या नावांची अदलाबदल केली जाते आहे.१०. २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नवी टीम तयार करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाच्या नावांची अदलाबदल केली जाते आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!