अरेरे! TOP 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचा एकही नाही

एका सर्वेक्षणात घेण्यात आला मुख्यमंत्र्यांचा आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं एक सर्वे केलाय. हा सर्वे आहे मुख्यमंत्र्यांबद्दलचा. देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांबद्दल करण्यात आलेल्या या सर्वेमध्ये एक विचित्रच गोष्ट समोर आली आहे. टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये एकाही भाजपशी संबंधित मुख्यमंत्री नसल्यानं चर्चांना उधाण आलंय. देशामध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? असा सर्वेक्षणाचा विषय होता. त्याद्वारे ही माहिती समोर आली आहे. त्यातील पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचं नाव नाही आहे.

कोण पहिलं?

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत, असा दावा या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीतील आप सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवला यांनी नंबर काढलाय. तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी तर चौथ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचं नाव समोर आलंय. पाचव्या स्थानी गोव्याच्या शेजारील राष्ट्र असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नंबर लागलाय. दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे या सर्वेक्षणात महत्त्वाच्या स्थानी दिसून आले आहेत.

कोण कमी? कोण जास्त?

ओडिशा, दिल्ली आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारसहित तीन मोठ्या भाजपाशासित राज्यांची सरासरी लोकप्रियता राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रीय लोकप्रियतेच्या सरासरीपेक्षा अधिक चांगलं काम करत आहेत.

दरम्यान, 5 सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी भाजपचे 2 मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्ममंत्र्याचा समावेश आहे. म्हणजेच खराब कामगिरी करणाऱ्या 5 पैकी 3 मुख्यमंत्री भाजपाचे आहेत. तामिळनाडूत पलानीस्वामींना भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे.

TOP 10 मुख्यमंत्री कोण?

नवीन पटनायक (ओडिशा)
अरविंद केजरीवाल (दिल्ली)
जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)
पी. विजयन (केरळ)
उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)
भूपेश बघेल (छत्तीसगड)
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)
शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश)
प्रमोद सावंत (गोवा)
विजय रुपाणी (गुजरात)

खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत कोण?

त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)
मनोहरलाल खट्टर (हरयाणा)
कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)
के. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)
के. पलानीस्वामी (तामिळनाडू)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!