केरळमध्ये ‘टोमॅटो फिव्हर’ आजाराचा धुमाकूळ, ‘हे’ आहे कारण…

केरळमध्ये आतापर्यंत 80 मुलांना संसर्ग

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: एकीककडे संपूर्ण जग कोरोना महामारीसोबत लढा देत असताना दुसरीकडे नवनवीन आजारांनी डोकं वर काढायला सुरूवात केलीय. आधी कोरोना, त्यानंतर मंकीपॉक्स आणि आता टोमॅटो फिव्हर नावाच्या आजारानं डोकं वर काढलंय. केरळमध्ये टोमॅटो फिव्हर नावाच्या आजारानं धुमाकूळ घालण्यास सुरूवात केलीय. अनेक भागात या आजाराचे रुग्ण आढळून येतायत. लहान मुलांना या आजाराचा संसर्ग होतोय.
हेही वाचाःराज्यात ‘या’ भागात आज पुन्हा अवकाळी सरी शक्य…

80 मुलांना टोमॅटो व्हायरसची लागण

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये आतापर्यंत 80 मुलांना टोमॅटो व्हायरसची लागण झालीय. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडू प्रशासनानं आरोग्य यंत्रणेला केरळच्या सीमेवरील जिल्हे आणि गावांवर लक्ष ठेवण्यास सांगितलंय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, टोमॅटो फिव्हरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असल्यानं सीमावर्ती भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
हेही वाचाःगोवा : नोकऱ्यांसाठी अर्ज केलेल्या हजारो युवकांसाठी खूशखबर!…

इतर कोणत्याही राज्यात या आजाराचा प्रसार नाही

सुरूवातीला या फिव्हरचे रुग्ण केरळमधील आर्यंकावू, आंचल आणि नेदुवाथुर या भागात आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. रुग्ण आढळून येताच कर्नाटकचं आरोग्य प्रशासन सतर्क झालं असून आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी केरळमधून दक्षिण कन्नड, उडुपी, कोडागु, चामराजनगर आणि म्हैसूर इथं जाणार्‍या प्रवाशांवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान, केरळव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात या आजाराचा प्रसार झाल्याची माहिती मिळालेली नाही. या आजाराची लागण झालेल्या बालकांच्या अंगावर टोमॅटोसारखे छोटे गोल पुरळ उठतात. त्यामुळे हा आजार टोमॅटो फिवर म्हणून ओळखला जातो.
हेही वाचाःपरप्रांतिय महिलेचा गोव्यात खून ; मात्र पती…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!