Tokyo Paralympics: भाविना पटेल गोल्ड मेडलपासून अवघं एक पाऊल दूर

उपांत्य फेरीमध्ये चीनच्या झँग मियाओला केलं पराभूत; भाविनाकडून आता सुवर्णपदकाच्या आशा वाढल्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारताची स्टार टेबल टेनिस प्लेअर भाविना पटेलनं अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. भाविना पटेल आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देण्यापासून अवघं एक पाऊल दूर आहे.

हेही वाचाः अर्थव्यवस्था बळकटीसाठी कॅसिनो सुरू होणे आवश्यक!

उपांत्य फेरीमध्ये चीनच्या झँग मियाओला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश

टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केलाय. या स्पर्धेमध्ये तिने उपांत्य फेरीमध्ये चीनच्या झँग मियाओला पराभूत करत दणक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीमध्ये पोहचणारी ती पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भाविनाने सर्बियाच्या बोरिस्लाव्हा पॅरिच रँकोव्हिच हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.

३-२ असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं

३४ वर्षीय भाविनाने चीनच्या झँग मियाओला ३-२ असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ ने भाविनाने उपांत्य सामना जिंकला. आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावता आलेलं नाही. त्यामुळेच भारताची पहिली गोल्डन गर्ल होण्याची संधी भाविनाकडे आहे. २०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पॅराऑलिम्पियन दीपा मलिकने अंतिम फेरीत प्रवेश केलेला. मात्र त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावलं लागलं होतं. आता भाविनाकडे सुवर्ण कामगिरी करुन इतिहास घडवण्याची चांगली संधी आहे.

हेही वाचाः माझी अटक बेकायदेशीर

भाविनाकडून आता सुवर्णपदकाच्या आशा

२०१७मध्ये आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाची तिसऱ्या क्रमांकाची लढत रद्द करण्याची विनंती आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने मान्य केली. त्यामुळे उपांत्य लढतीमधील दोन्ही पराभूत स्पर्धकांना कांस्यपदक दिले जाऊ लागले. म्हणूनच भाविनाने उपांत्य फेरी प्रवेश निश्चित केल्यानंतर तिचं पदक नक्की मानलं जातं होतं. याआधी, उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भाविनाने ब्राझिलच्या जॉयसे डी ऑलिव्हेराचा १२-१०, १३-११, ११-६ असा २३ मिनिटांत पराभव केला. तथापि, गटसाखळीमधील दोन्ही सामने गमावल्यामुळे गुरुवारी सोनल पटेलचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे टेबल टेनिसमध्ये भाविनाकडून आता सुवर्णपदकाच्या आशा देशाला लागून राहिलेल्या आहेत.

हेही वाचाः मिरामार किनारा ‘ब्लू फ्लॅग’ करण्यासाठीची अधिसूचना रद्द

भारतीय क्रीडारसिकांच्या पाठबळामुळे मी पॅरालिम्पिक पदक जिंकू शकले. भाविनालाही पाठबळ द्यावे, असे मी चाहत्यांना आव्हान करत असल्याचं या सामन्याआधी बोलताना भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी म्हटलं होतं.

हा व्हिडिओ पहाः Politics | Exclusive | काँग्रेस उमेदवारीसाठी उदय आणि टोनी इच्छुक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!