Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलास’

भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक, पाहा व्हिडीओ

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: तब्बल 41 वर्षानंतरचा वनवास संपला…भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला…टोक्यो ऑलिम्पकमध्ये कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 विजय मिळवला आहे. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाशी विशेषत: कर्णधार मनप्रीत सिंगशी बातचीत करत त्याचं कौतुक केलं आहे.

हेही वाचाः डान्सिंग अंकललाही लाजवेल असा ‘डान्सिंग मुंबई पोलीस’

मोदी यांनी विजयानंतर भारतीय हॉकी संघातील खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक यांच्याशी बातचित केली. यावेळी त्यांनी कर्णधार मनप्रीतचं विशेष कौैतुक करत ‘तू इतिहास लिहिलास’ अशा शब्दात त्याचं कौतुक केलं. तसंच बेल्जियमविरुद्ध पराभवानंतर शांत झालेला मनप्रीत आज मात्र जोशपूर्ण दिसून आला असंही मोदी यांनी नमूद केलं. त्यांनी इतर खेळाडूंशी देखील बातचीत करत त्यांचही अभिनंदन केलं.

हेही वाचाः Tokyo Olympic 2021 |अभिमानास्पद! कुस्तीपटू रवीकुमार दहियाला रौप्य पदक

असा रचला भारताने इतिहास

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत जर्मनीने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण भारत आत्मविश्वासने खेळत होता. पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीला -1-0 ने आघाडी मिळाली. म्हणजेच पहिल्या क्वार्टरवर जर्मनीचं वर्चस्व राहिलं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच भारताच्या सिमरनजीतने एक गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. पण नंतर पुन्हा जर्मनीने दोन करत भारताला बॅकफूटला ढकललं. पण जर्मनीच्या दोन गोलनंतरही भारतीय संघ तसूभरही मागे हटला नाही. भारताने जिद्द न सोडता आपला खेळ दिमाखात सुरु ठेवला.

हेही वाचाः संतापजनक! हॉकी टीम पराभूत झाल्यानंतर खेळाडूच्या घराजवळ फोडले फटाके

प्रत्येक भारतीय खेळाडूच्या मनात आज आत्मविश्वास ठासून भरला होता. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा हे भारतीय संघाने ठरवलं होतं. त्यानुसार हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी कमी केली. तसंच हरमनप्रीतने पुन्हा गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. म्हणजेच तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले.

हेही वाचाः HDFC ची वादग्रस्त जाहिरात, सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग

आणि 41 वर्षानंतरचा तो ऐतिहासिक क्षण आला…!

काहीही करुन आजचा सामना जिंकायचाच, असा निश्चय भारतीय संघाने केला होता. त्यानुसार तिसऱ्या क्वार्टरची सुरुवात भारतीय संघाने जबरदस्त केली. सामन्याच्या 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंगने गोल केला. तिथंच भारताला आघाडी मिळाली. लगेचच 5 मिनिटांनी सिमरनजीतने गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने पेनल्टी कॉर्नर मिळवले पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यास जर्मनीला अपयश आलं. सरतेशेवटी कांस्य पदकाच्या सामन्यात भारताने जर्मनीला 5-4 ने पराभूत करुन 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!