Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा यामागुचीवर विजय

सेमी फायनलचं तिकीटं मिळवत पदकाच्या अगदी जवळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः टोक्यो ओलिम्पिकमध्ये बॅडमिंटन कोर्टवर भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या यामागुचीला नमवलं आहे. या विजयासह सिंधूने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! गोवा भूमी अधिकारीता विधेयक मंजूर

सिंधूने पहिला सामना 23 मिनिटांत संपवला. सामना तिने 21-13 च्या फरकाने खिशात घातला. सुरुवातीपासून सामन्यात दोघींमध्ये चांगली चुरस दिसून आली. दोघीही 6-6 च्या स्कोरवर असताना सिंधूने आक्रमक पवित्रा घेत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेट अटीतटीचा झाला. 56 मिनिटं चाललेल्या दुसऱ्या सेटमध्ये यामागुचीने पुनरागमन करत 16-16 ने बरोबरी साधली. पण अखेर सिंधूने पुन्हा पुनरागमन करत सामना 22-20 ने विजय जिंकला.

हेही वाचाः भारतीय संघावरील कोरोनाचे संकट गडद

यामागुचीवर सिंधूचा 12 वा विजय

भारताच्या पीव्ही सिंधूने दुसऱ्या गेममध्ये अप्रतिम खेळ केला. पण यामागुचीने देखील चांगली टक्कर देत सामन्यात बरोबरी साधली. पण अखेर सिंधूने सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला. याआधीही सिंधूने अनेकदा यामागुचीला नमवलं आहे. बॅडमिंटन कोर्टवर 19 वेळा सिंधू आणि यामागुची आमने-सामने आले भिडले असून 12 वेळा सिंधूने विजय मिळवला असून आजच्या विजयासह तिने विजयी मालिका कायम ठेवली.

हेही वाचाः पुरात घर कोसळलेल्या कुटुंबांना दीड ते २ लाख रुपयांची मदतः मुख्यमंत्री

अशी असेल सेमीफायनलमधील लढत

पीव्ही सिंधूने आता सेमीफायनलमध्ये जागा मिळवली असून सेमीमध्ये तिची लढत अजून कोणासोबत असेल हे नक्की झालेले नाही. आता थायलंडच्या रत्नाचोक आणि चीनी ताइपेची ताई त्जु यिंग यांच्यात उपांत्यूपूर्व फेरीचा सामना होणार असून यातील विजेत्यासोबत सिंधू सेमी फायनलचा सामना लढेल. सिंधूसाठी चीनी ताइपेच्या खेळाडूसोबत सामना लढणे अवघड असणार आहे. कारण दोघी आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात सिंधू केवळ 5 सामने जिंकली असून ताई त्जु यिंगने 13 सामने जिंकले आहेत.

हा व्हिडिओ पहाः Politics | Delhi | Tito & Sharad Pawar | रिकार्डो डिसोझा भाजपात जाणार की एनसीपीत?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!