Tokyo Olympics 2021: डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये भारताची कमलप्रीत कौर

यंदाच ऑलिम्पिक डेब्यू करणाऱ्या कमलप्रीत कौरने भारतासाठी पहिल्या वहिल्या एथेलेटिक्स खेळातील पदकाच्या आशा जागवल्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंग या दोन खेळात पदकं मिळवली असून आता अ‍ॅथलेटिक्स  खेळातील पहिलं वहिलं पदकही मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. डिस्कस थ्रो स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर हिने फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. ही कमलप्रीत सहभाग घेत असलेली पहिली ऑलिम्पिक असून तिने 64 मीटरचं डिस्कस फेकत क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. कमलप्रीत पेक्षा अमेरिकेची डिस्कस थ्रोअर 66.42 मीटर डिस्कस फेकून पुढे होती.

हेही वाचाः ऑगस्टमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या

कमलप्रीतने कमाल कामगिरी केली असली तरी दुसरीकडे या स्पर्धेत चौथ्या वेळेस भाग घेणारी भारतीय अ‍ॅथलिट सीमा पुनियामात्र दुसऱ्या प्रयत्नातही 60.57 मीटर डिस्कस फेकून सहाव्या स्थानावर राहिली. सर्व स्पर्धाकांत आणि फेऱ्यांमध्ये मिळून पुनिया 16 व्या स्थानावर राहिली. दरम्यान टॉप 12 डिस्कस थ्रोअरच फायनलमध्ये जात असल्यानं पुनिया पुढे जाऊ शकली नाही.

हेही वाचाः Tokyo Olympics 2021: वंदनाची ऐतिहासिक कामगिरी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

प्रत्येक प्रयत्नात कमलप्रीत यशस्वी

कमलप्रीत कौरने क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये एकही प्रयत्न अयशस्वी होऊ दिला नाही. तिने प्रत्येक प्रयत्नात 60 मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंतच डिस्कस फेकले. कमलप्रीतने पहिल्या प्रयत्नात 60.29 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटरपर्यंतच अंतर पार केलं.

हेही वाचाः दुचाकी चोरीप्रकरणी दोघांना अटक

कोण आहे कमलप्रीत?

कमलप्रीत कौर पंजाबच्या मुक्तसर साहिब जिल्ह्यातील बादल गावची रहिवाशी आहे. तिने स्वत:च सांगितलं होतं की मी अभ्यासात जास्त हुशार नसल्यानं प्रशिक्षकांनी मला एका राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सांगितलं होतं. तिथे मी चांगल प्रदर्शन दाखवलं होतं. अभ्यासात जास्त हुशार नसल्यानं कमलप्रीतला खेळांमध्ये जास्त लक्ष द्यावं असं वाटलं. ज्यानंतर तिने या डिस्कस थ्रोमध्ये अधिक सराव करत आज इथवरचा प्रवास पूर्ण केला आहे. 2019 मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ती पाचव्या स्थानावर होती. 2019 संस्करणमध्ये 60.25 मीटर डिस्कस थ्रो करत तिने सुवर्ण पदकही पटकावलं होतं.

हा व्हि़डिओ पहाः Video | Politics | Inside Story | अविश्वास ठराव रोखण्यासाठी कार्यालयाला टाळ्याचा षडयंत्र

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!