Tokyo Olympics 2021: वंदनाची ऐतिहासिक कामगिरी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

भारतीय महिला हॉकी संघ विजयी; पुढील फेरीची आशा कायम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला 4-3 च्या फरकाने पराभूत केलं. ग्रुप स्टेजमधील भारतीय महिला हॉकी संघाचा हा दुसरा विजय आहे. या विजयासह क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचण्याची भारताची आशा अजूनही कायम आहे. दरम्य़ान या दमदार विजयात सिंहाचा वाट मिळवला तो सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच वंदना कटारियाने. तिने सामन्यात एक ऐतिहासिक कामगिरी करत हॅट्रिक लगावली. वंदनाने 3 गोल लगावत भारताला विजय मिळवून दिला. ऑलिम्पिकमधील एका सामन्यात 3 गोल करणारी वंदना पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे.

हेही वाचाः दुचाकी चोरीप्रकरणी दोघांना अटक

भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात पहिल्या क्वॉर्टरमध्ये 1-1 असा स्कोर होता. सामन्यात चौथ्या मिनिटाला वंदना कटारियाने पहिला गोल करत भारतीय महिलांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही वेळातच आफ्रीका संघानेही गोल करत बरोबरी साधली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील तसंच घडलं. आधी भारतीय महिलांनी गोल केल्यानंतर पुन्हा आफ्रिकेच्या महिलांनी पलटवार करत 2-2 असा स्कोर केला.

हेही वाचाः रविवारी साखळीत काँग्रेसची ‘सद्बुद्धी यात्रा’

वंदनाची हॅट्रिक, भारताचा विजय

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी पुन्हा एक-एक गोल केला. ज्यामुळे दोन्ही संघ 3-3 अशा स्कोरवर होते. ज्यानंतर शेवटचा आणि चौथा असा निर्णायक क्वॉर्टर सुरु झाला. ज्यात पुन्हा एकदा वंदना कटारियाची जादू चालली आणि तिने एक अप्रतिम गोल करत भारताला 4-3 ची आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर आफ्रिका संघाला एकही गोल करता न आल्याने भारतीय महिला विजयी झाल्या.

क्वॉर्टर फायनलच्या तिकिटासाठी आयर्लंडचा पराभव महत्त्वाचा

भारतीय महिला हॉकी संघाने क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले आहेत. आता फक्त आज संध्याकाळी होणाऱ्या ग्रेट ब्रिटेन आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात आयर्लंडचा पराभव होणं गरजेचं आहे. त्यानंतरच भारताला क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!