Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक

लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. या सोबतच तिने किमान कांस्य पदक पक्क केलं होत. मात्र आज सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीला नमवून आपल्या पदकाचा रंग बदल्याण्याची संधी लवलीनाकडे होती. पण अटीतटीच्या सामन्यात सुरमेनेलीने लवलीनाला 5-0 ने नमवत पुढची फेरी गाठली.

हेही वाचाः जम्मू काश्मीरच्या विकासाची पहाट

भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे. याआधी 2008 मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर 2012 लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे लवलीनाने पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक खिशात घातलं आहे.

हेही वाचाः ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच होणार !

असा झाला सामना

सामन्यात दोन्ही बॉक्सरनी उत्तम खेळ दाखवला. पण टर्कीच्या सुरमेनेलीने चपळ खेळ दाखवत सुरुवातीपासून सामन्यावर दबदबा कायम ठेवला. त्यामुळे तिचे पंचेसही लवलीनाला थेट लागले. अचूक टार्गेट गाठत तिने अधिक गुण मिळवले. त्यामुळे तिन्ही राउंडमध्ये तिने जजेसची मनं जिंकत सामना 5-0 ने आपल्या नावे केला.

हेही वाचाः ऑटोपायलटमुळं वाचले चालकाचे प्राण ; एलन मस्कची ‘टेस्ला’ पुन्हा चर्चेत

लवलीनाचा 10 वा पराभव

पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या 23 वर्षीय लवलीनाचा हा 10 वा पराभव होता. तिने आतपर्यत 14 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे सेमीफायनल जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या टर्कीच्या बुसानाजचा हा 26 वा विजय होता तिने केवळ 6 सामने गमावले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!