शाब्बास! बजरंग पुनियानं केली कांस्य पदकाची कमाई

सेमी फायनलमध्ये मिळवला 8-0 असा एकतर्फी विजय; भारताची पदकसंख्या सहावर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्य पदकाची कमाई केली. त्याने सेमी फायनलमध्ये 8-0 असा एकतर्फी विजय मिळवत पदक पटकावलं. कझाकस्तानच्या नियाजबेकोवशी बजरंगची लढत होती. कझाकस्तानच्या कुस्तीपटूनं सुरुवात बचावत्मक केल्यानं बजरंगला पहिला पॉईंट मिळाला. पहिल्या राऊंडनंतर बजरंग 2-0 नं आघाडीवर होता. दुसऱ्या राऊंडमध्येही बजरंगनं आणखी दोन पॉईंट घेत नियाजबेकोववर 4 पॉईंट्सची आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत बजरंगनं कांस्य पदक पटकावलं.

हेही वाचाः पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं म्हणजे वैवाहिक बलात्कार

बजरंगचा प्रवास 

65 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियाचा यापूर्वी  अझरबैजानाच्या हाजी अलियेव्हनं 12-5 ने पराभव केला होता. बजरंगनं क्वार्टरफायनलध्ये कझाकस्तानच्या इराणच्या मूर्तझा चेकाचा संघर्षपूर्ण लढतीमध्ये पराभव केला होता. त्या मॅचमध्ये बजरंगनं शेवटच्या काही सेकंदामध्ये बाजी फिरवली. प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचाः एकही जण कसाकाय पॉझिटिव्ह आढळत नाही?

मूर्तझानं पहिल्यांदाच बजरंगचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बजरंगनं मोठ्या कौशल्यानं त्यातून सुटका केली. बजरंगनं सुरुवातीला बचाव करण्यावर भर दिला. पहिल्या राऊंडनंतर इराणच्या कुस्तीपटूकडं एक पॉईंटची निसटती आघाडी होती. दुसऱ्या राऊंडमध्ये दोघांनी आक्रमक खेळ केला. बजरंगची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे. मात्र त्यानं यापूर्वी कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं.

हेही वाचाः BLAST | हेडफोन्सचा स्फोट होऊन तरुणाचा मृत्यू

यापूर्वी भारताच्या रवी कुमार दहियानं सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. तर दीपक पुनियाचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. भारताच्या अन्य कुस्तीपटूंनाही मेडल मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे शनिवारी सर्व आशा बजरंगवर होत्या. बजरंगनं या अपेक्षांची पूर्ती करत कांस्य पदक पटकावलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | YOUTH RESCUE | तोल जाऊन युवक पडला विहिरीत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!