Tokyo Olympic 2021 |अभिमानास्पद! कुस्तीपटू रवीकुमार दहियाला रौप्य पदक

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट: रवी दहियाने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करत भारताची मान अभिमानाने उंंचावली. त्याने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय पैलवान रवी दहियाने टोक्यो कझाकिस्तानच्या सनायेव नूरिस्लामला धोबीपछाड देत सेमीफायनल सामन्यात 57 किलो वजनी गटात दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरित प्रवेश केला. अंतिम फेरीत पराभव झाल्यानं रवी दहियाला रौप्य पदक मिळालं आहे. रवी दहिया हे नाव आतापर्यंत बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. पण रवीने जेव्हा ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तेव्हा सर्वांच्या ओठी रवी दहिया हे नाव आलं. पण हा रवी दहिया नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या त्याची संपूर्ण माहिती…
हेही वाचाः संतापजनक! हॉकी टीम पराभूत झाल्यानंतर खेळाडूच्या घराजवळ फोडले फटाके
कोण आहे रवी दहिया?
हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावाचा रवी रहिवासी आहे आणि त्याच गावातील आखाड्यात त्याने कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरवात केली. या गावातील महावीर सिंग आणि अमित दहिया यांनी भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. भारताची राजधानी दिल्ली येथील छत्रसाल कुस्ती स्टेडियम हे रवीचं होम ग्राउंड आहे आणि त्याने तिथे 10-11 वर्षं वयापासून सराव केला आहे. जागतिक पातळीवर खेळणारे अनेक पैलवान या ठिकाणी सराव करतात. 23 वर्षीय रवीने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (2019), 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (2018) आणि आशियाई कुस्ती स्पर्धा (2020 आणि 2021)मध्ये पदके जिंकली आहेत.
हेही वाचाः HDFC ची वादग्रस्त जाहिरात, सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग
रवी दहिया म्हणाला होता….
टोकियो ऑलिम्पिकपूर्वी रवी दहियाची एक खास मुलाखत झाली होती. या मुलाखतीमध्ये रवी म्हणाला होता की,
माझं लक्ष्य कांस्य किंवा रौप्य पदक जिंकण्याचं नाही, तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचं आहे.
हेही वाचाः पालिकेला अंधारात ठेवून नगरसेवकांचा दुकानावर कारवाईचा प्रयत्न
पहिल्याच सामन्यात नेत्रदीपक कामगिरी
टोकियो ऑलिम्पिकमच्या पहिल्याच सामन्यात रवी दहियाने नेत्रदीपक कामगिरी केली. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचल्यावर रवीकडून भारतीयांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या. पण अंतिम फेरीत खेळताना रवीला प्रतिस्पर्धी खेळाडूपेक्षा चांगाल खेळ करता आला नाही आणि त्याला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्याा रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं आहे.