पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं म्हणजे वैवाहिक बलात्कार

घटस्फोटासाठी ठोस कारण ठरेल; केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं आणि तिच्या इच्छेच्या विरोधात शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे वैवाहिक बलात्कार आहे. या कारणामुळे पत्नीला आपल्या पतीपासून घटस्फोट घेता येईल, असा महत्वपूर्ण निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. केरळ फॅमेली कोर्टने दिलेल्या घटस्फोटासंबंधी एका निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा यासाठी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका फेटाळताना केरळ उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. 

हेही वाचाः साखळी नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव फेटाळला

वैवाहिक बलात्कार हा घटस्फोट घेण्यासाठी ठोस आधार

या खटल्याची सुनावनी करताना न्यायमूर्ती ए. मोहम्मद मुस्ताक आणि न्यायमूर्ती कौसर एडप्पागत यांच्या खंडपीठाने सांगितलं की, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी धर्मनिरपेक्ष कायद्याच्या कक्षेत याव्यात आणि आता देशात पुन्हा एकदा विवाह कायदा नव्यानं तयार करण्याची वेळ आली आहे. खंडपीठाने ही याचिका फेटाळताना स्पष्ट केलं की, फौजदारी कायद्यांप्रमाणे वैवाहिक बलात्काराला आपल्या देशात मान्यता नाही, केवळ या कारणामुळे ही गोष्ट न्यायालयाच्या दृष्टीने क्रुर नाही, असं होणार नाही. ही गोष्ट न्यायालयाच्या दृष्टीने क्रुरच आहे आणि वैवाहिक बलात्कार हा घटस्फोट घेण्यासाठी ठोस आधार आहे. 

हेही वाचाः जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी

केरळ फॅमेली कोर्टने दिली घटस्फोटाच्या अर्जाला मान्यता

केरळ फॅमेली कोर्टने एका प्रकरणात वैवाहिक बलात्काराचं कारण देत पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जाला मान्यता दिली होती. या निर्णयाविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि फॅमेली कोर्टचा निर्णय बदलावा, आपल्या वैवाहिक अधिकारांचे संरक्षण करावं अशी विनंती केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना सांगितलं की, पत्नीच्या शरीराला पतीने आपली संपत्ती समजणं आणि तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे वैवाहिक बलात्कारच आहे. हे कारण घटस्फोट घेण्यासाठी ठोस आधार असेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. 

हेही वाचाः पत्नीच्या आरोपांवर हनी सिंहचं जाहीर उत्तर

खटल्यातील दाम्पत्याचा विवाह 1995 साली झाला

या खटल्यातील दाम्पत्याचा विवाह 1995 साली झाला होता. पेशाने डॉक्टर असलेल्या पतीने विवाहाच्या वेळी आपल्या पत्नीच्या घरच्यांकडून सोन्याचे 501 शिक्के, एक कार आणि एक फ्लॅट घेतला होता. यावर फॅमेली न्यायालयाने सांगितलं की, पती हा पत्नीकडे पैसे कमवण्याचं मशिन या दृष्टीकोनातून पाहतो आणि तशा प्रकारचा व्यवहार करतो. 

हेही वाचाः ‘नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात’

पत्नीने केवळ विवाह झाल्यामुळे पतीचे हे सर्व प्रकार सहन केले. पण शेवटी हे सर्व सहन करण्याच्या पलिकडे गेल्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज केला. 

हा व्हिडिओ पहाः Video | GOA BAGAYATDAR | गोवा बागायतदारतर्फे नवी सुविधा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!