सर्वधर्मसमभाव! मुस्लिम सैनिकानं आपल्या खांद्यावरून हिंदू महिलेला नेलं मंदिरात

कॉन्स्टेबल शेख अरशद आणि हवालदाराचं सर्वच स्तरातून कौतुक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: आंध्रप्रदेशमधील तिरुमाला परिसरात एक आदर्श घटना पाहायला मिळाली. एका मुस्लिम सैनिकाने एका हिंदू महिलेला 6 किलोमीटर आपल्या खांद्यावर बसवून नेलं. जेणेकरून ती स्त्री तिरुमाला मंदिरात भगवान वेंकटेश्वरची पूजा करू शकेल. चला जाणून घेऊया या मुस्लिम कॉन्स्टेबलने एका हिंदू महिलेला कशी मदत केली.

तर घडलं असं की, 58 वर्षीय महिला मंगी नागेश्वरम्मा तिरुमाला मंदिरात दोन दिवसांच्या धार्मिक दर्शनासाठी गेली होती. पायी प्रवास करत असताना मध्येच तिची तब्येत अधिकच बिघडली. तिला चालवेना. पायांनीही हार मानली. डोंगरावर तिरुमाला मंदिर अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर होते. मंगी नागेश्वरम्मा नंदलूर मंडळासोबत तिरुमाला दर्शनासाठी चालत निघाली होती. 22 डिसेंबर रोजी दुपारी प्रवासाच्या दरम्यान त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला.

यावेळी कडप्पा जिल्ह्यातील विशेष पोलिस कर्मचारी यात्रेकरूंच्या देखरेखीसाठी होते. तेव्हाच कॉन्स्टेबल शेख अरशदचं लक्ष नागेश्वरम्माकडं गेलं. कॉन्स्टेबल शेख अरशदने प्रथम मंगी नागेश्वरम्मा यांना रुग्णालयात नेलं. आणि नंतर तिला आपल्या खांद्यावर उचलले आणि 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिरात चालत नेलं. त्याशिवाय आणखी एका हवालदारानेही अशाच एका वृद्ध नागेश्वरा रावला खांद्यावर बसवून रस्त्यावर सोडलं होत जेणेकरून त्यांना आरामात घरी जाता यावं.

कॉन्स्टेबल शेख अरशद आणि हवालदारानं केलेल्या कार्याचं यात्रेकरुंनी कौतुक केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!