जगातील प्रभावशाली 100 लोकांमध्ये पंतप्रधान मोदी, आयुष्मानसह 5 भारतीय

Time Magazines :टाईम मॅगझिननं जगभरातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची लोकांची लिस्ट घोषित केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आयुष्मान खुराणासह पाच भारतीयांनी स्थान मिळवलं आहे.

विधिता प्रभू | प्रतिनिधी

नवी दिल्ली : टाईम मॅगझिननं जगभरातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची लोकांची लिस्ट घोषित केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), अभिनेता आयुष्मान खुराणासह (Atushman Khurana) पाच भारतीयांनी स्थान मिळवलं आहे. सोबतच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, (Sundar Pichai) लंडनमधील एचआयव्हीवर संशोधन करणारे भारतीय वंशाचे डॉक्टर रवींद्र गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनातून चर्चेत आलेल्या बिल्किस दादीचं नाव देखील या यादीत आलं आहे. हे सर्व लोकं या वर्षी जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले आहेत.

या यादीत आयुष्‍मान खुराणा हा एकमेव भारतीय अभिनेता आहे, जो जगातील सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत आलाय. यानंतर आयुष्माननं लिहिलं आहे की, टाईम्स मॅगझिनकडून घोषित केलेल्या या यादीत नाव आल्याने मोठा सन्मान मिळाल्यासारखं वाटत आहे. यावर त्याच्या फॅन्सनी त्याचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोननं देखील आयुष्मानचं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्‍साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump), जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल (angela merkel) यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!