‘ही’ आहे जगातील चौथी सर्वात श्रीमंत व्यक्ती…

बिल गेट्स, मुकेश अंबानींना टाकले मागे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : जगातील श्रीमंतांची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. या यादीनुसार अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. अदानी यांची संपत्ती ११५.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे तर बिल गेट्स यांची संपत्ती १०४.६ अब्ज डॉलर आहे.
हेही वाचा:भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांना मोठी मागणी, ‘हे’ आहे कारण…

एलोन मस्क पहिल्या स्थानावर

या यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी दहाव्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९० अब्ज डॉलर्स आहे. तर टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे संस्थापक एलोन मस्क हे २३५.८ अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहे.
हेही वाचा:GOA | ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!