शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्राचा कालावधी सात वर्षांहून वाढवून आजीवन

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्लीः केंद्र सरकारने, शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्र अर्थात टीईटीचा योग्यता प्रमाणपत्राच्या (TET Certificates) चा कालावधी सात वर्षांहून वाढवून आजीवन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. हा निर्णय 2011 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल.
हेही वाचाः मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठी कळंगुटला शहरी दर्जा
राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश करतील कार्यवाही
सात वर्षांचा कालावधी समाप्त झाला आहे अशा उमेदवारांसाठी नवे शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्र पुन्हा वैध करणं किंवा नव्याने उपलब्ध करणं ही कार्यवाही संबंधित राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश करतील, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचाः रुग्णवाढीला ब्रेक, रिकव्हरी रेटमध्ये सुधार! पण एकूण मृत्यू २७००च्या पार
रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टिने पाऊल
शिक्षण क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टिने हे सकारात्मक पाऊल असल्याचं पोखरियाल म्हणाले.
Validity period of Teachers Eligibility Test (TET) qualifying certificate has been extended from 7 years to lifetime with retrospective effect from 2011. https://t.co/8IQD3cwRTz (1/2) pic.twitter.com/EGi5IJ2wNu
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) June 3, 2021
शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्र आवश्यक
दरम्यान शाळेत शिक्षक म्हणून रूजू होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला हे शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्र आवश्यक असते. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद म्हणजेच एनसीटीई ने 11 फेब्रुवारी 2011 दिवशी जारी केलेल्या नियमांनुसार राज्य सरकार टीईटी परीक्षा आयोजित करणार आणि टीईटी योग्यता प्रमाणपत्र वैधता कालावधी परीक्षा उर्तीर्ण झाल्यानंतर 7 वर्ष असेल.