कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल

शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे.

हेही वाचाः शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?

तिसऱ्या लाटेत प्रत्येक दिवशी 1 लाख रुग्ण सापडणार

देशात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर दररोज एक लाख नवे रुग्ण नोंदवले जातील. मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. त्यावेळी दररोज चार लाख नव्या रुग्णांची नोंद होत होती. दुसऱ्या लाटेत हजारो लोक मरण पावले तसेच कित्येक लाख कोरोना विषाणूने संक्रमित झाले.

अग्रवाल यांनी ट्वीट केले की, जर नवीन उत्परिवर्तन झाले नाही तर सध्याची स्थिती कायम राहील. तसेच सप्टेंबरपर्यंत 50 टक्के अधिक संसर्गजन्य उत्परिवर्तन आढळले तर नवीन प्रकार उदयास येईल. तिसरी लाट नवीन पॅटर्नमधूनच येईल आणि अशावेळी नवीन प्रकरणे दररोज एक लाखापर्यंत वाढतील. सरकारने कोरोनाच्या तिसर्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी तयारी सुरू केली असतानाच अग्रवाल यांनी हे ट्विट केले आहे.

हेही वाचाः KBC 13 | केबीसी 13च्या हॉटसीटवर बसणं रेल्वे अधिकाऱ्याला पडलं महागात

ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान तिसरी लाटेचा अंदाज

गेल्या महिन्यात वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान तिसरी लाट शिगेला पोहोचेल आणि सार्स-कोव्ह-2 चे अधिक संसर्गजन्य उत्परिवर्तन झाल्यास दररोजची प्रकरणे दररोज दीड लाख ते दोन लाखांच्या दरम्यान असतील. तथापि, डेल्टापेक्षा अधिक संसर्गजन्य उत्परिवर्तन उघड झालेले नाही. गेल्या आठवड्याचा अंदाजही याप्रमाणेच होता. परंतु नवीन अंदाजानुसार, दैनंदिन रुग्णांची संख्या एक ते दीड लाखांपर्यंत कमी करण्यात आली आहे. ताज्या आकडेवारीमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये करण्यात आलेल्या लसीकरण आणि सेरो सर्वेक्षणांचा समावेश आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाची चिंता भलतीच वाढवली होती. मात्र त्यानंतर लसीकरणावर भर देण्यात आल्यामुळे तिसरी लाट कमी चिंतेची असेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

हा व्हिडिओ पहाः SAD STORY | VANARMARI | गोव्यातील वानरमारी समाजाची दाहकता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!