भारतात वाढत आहे टीबीच्या रूग्णांचे प्रमाण…

जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग अहवालातून स्पष्ट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : भारतातले टीबी अर्थात क्षयरोगाच्या रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या २०२२ वर्षातल्या जागतिक क्षयरोग अहवालातून स्पष्ट होतं आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात टीबीचे २८ टक्के रूग्ण आढळतात आणि क्षयरूग्णांच्या एकूण संख्येपैकी दोन तृतियांश पेक्षा अधिक रूग्ण संख्या आढळणाऱ्या आठ देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
हेही वाचाःGoa Accident News: वाळपईत भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीचालकाचा हातच निखळला…

आठ देशांमध्ये भारताचा समावेश

इंडोनेशिया मध्ये हे प्रमाण ९ पू्र्णांक २ टक्के, चीनमध्ये ७ पूर्णांक ४ टक्के तसेच पाकिस्तान ५ पूर्णांक ८ टक्के, नायजेरिया ४ पूर्णांक ४ टक्के, बांग्लादेश ३ पूर्णांक ६ टक्के आणि कांगो मध्ये ही संख्या २ पूर्णांक ९ टक्के आहे. २०२० मध्ये रूग्णसंख्येत घट झालेल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश होता. जगभरात २०२१ या वर्षामध्ये १० कोटी ६० क्षयरोगाच्या रूग्णांचे निदान झाले, ज्यामध्ये २०२० च्या तुलनेत ४ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तर १० लाख ६० हजार रूग्णांचा जीवाणूजन्य आजारांने मृत्यू झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.
हेही वाचाःदेशातील सर्व पोलिसांना मिळणार एकाच रंगाचा गणवेश…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!