‘या’ राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 21 जूनपर्यंत वाढला

कोरोना सक्रिय बाधितांची संख्या वाढल्याने घेतला निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

बेळगाव: कर्नाटकातील 11 जिल्ह्यांतील लॉकडाऊन 21 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जाहीर केला आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सायंकाळी हा निर्णय घोषित केला.

हेही वाचाः नर्सेची पुन्हा असोसिएशनकडे तक्रार

11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन वाढला

पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी तज्ज्ञांच्या समितीशीही चर्चा केली. बेळगावसह चिक्कमंगळुरू, दक्षिण कन्नडा, हासन, म्हैसुरू, कोडगू, बंगळुरू ग्रामीण, चामराजनगर, तुमकुरू, मंड्या आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमधील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील लॉकडाऊन 14 जून रोजी संपणार आहे. त्यानंतर या जिल्ह्यांना बाजारपेठ दुपारी 2 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची सूट मिळू शकते.

हेही वाचाः केंद्राचं स्मार्टवर्क : लस कंपन्यांच्या खिशात जाणारे राज्यांचे 17,920 कोटी वाचवले !

कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने घेतला निर्णय

बेळगाव जिल्ह्याचा लॉकडाऊन वाढवल्याचे स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री गोविंद करजोल म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याची सीमा बेळगाव जिल्ह्याला लागून आहे. या दोन्ही ठिकाणी सक्रिय बाधितांची संख्या अधिक आहे. बेळगावचा लॉकडाऊन वाढल्यामुळे गोव्यातील भाजीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!