किर्लोस्कर बंधूतही भाऊबंदकीचा वाद

130 वर्षांच्या वारसावरून वाद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: मालमत्ता, जमीन, जुमला अशी वादाची अनेक कारणं असतात. फार संपत्ती नसलेल्यांचे जसे वाद होतात, तसेच गर्भश्रीमंतातही संपत्तीवरून वाद होतात. धीरूभाई अंबानी यांच्या नंतर मुकेश अंबानी-अनिल अंबानी यांच्यात शीतयुद्ध झालं. टाटा समूहात सायरस मिस्त्री-रतन टाटांत वाद झाले. रेमंडच्या विजयपंत सिंघानिया यांना त्यांच्या मुलानेच घराबाहेर काढलं. त्यावरून वाद सुरू असताना आता आणखी एका मराठमोळ्या कार्पोरेट घराण्यात संपत्तीवरून वाद सुरू झाला आहे. सामान्यांच्या वादाचा परिणाम फार होत नसतो; परंतु कार्पोरेट घराण्यातील वाद बाहेर आला, तर त्याचे भांडवली बाजारावर आणि एकूण गुंतवणुकीवरही परिणाम होत असतात.

हेही वाचाः गोव्यातील पोलीस आणि अधिकारी मॅनेज होऊ शकतील

अंबानी बंधू, टाटा-मिस्त्री यांच्यासह देशात अशा बड्या औद्योगिक घरांचे वाद नेहमीच चर्चेत असतात. आता देशात आणखी एका मोठ्या कॉर्पोरेट हाऊसचा (किर्लोस्कर कुटुंब) वादंग चव्हाट्यावर आला आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाला 130 वर्षांचा इतिहास आणि वारसा आहे. संजय किर्लोस्कर यांच्या नेतृत्वात किर्लोस्कर ब्रदर्स लि ही कंपनी आहे.

हेही वाचाः कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलनुसार प्लेगची व्हॅक्सिन तयार; 40 लोकांवर होणार ट्रायल

त्यांचे भाऊ अतुल आणि राहुल यांच्याकडे चार कंपन्या आहेत. ते आता संजय यांच्या कंपन्या गिळंकृत करीत असल्याचा आरोप आहे. 130 वर्षांचा वारसा काढून घेऊन ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संजय यांनी केला आहे. संजय यांचे आरोप त्यांच्या दोन्ही भावांनी फेटाळून लावले आहेत.

हेही वाचाः सासष्टीतही कागदपत्रांत बेकायदा फेरफार करून जमिनी हडप

कुटुंबातील तीव्र मतभेदाच्या पार्श्वभूमीवर केबीएलने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) पत्राद्वारे कळवलं आहे, की किर्लोस्कर ऑईल इंजिन (कोएल), किर्लोस्कर इंडस्ट्रीज लि. (केआयएल), किर्लोस्कर वायवीय कंपनी (केपीसीएल) आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लि. (केएफआयएल) ने केबीएलचा वारसा दडपण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचाः गोवा दिवाळखोरीच्या दिशेने चाललायः सुदीन ढवळीकर

केबीएलने सेबीला दिलेल्या पत्रात अनेक तथ्यपूर्ण त्रुटी

याशिवाय त्यांनी केबीएली मालकी त्यांची दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सेबीला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. या संदर्भात संपर्क साधला असता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लि. च्या प्रवक्त्याने सांगितलं, की केबीएलने सेबीला दिलेल्या पत्रात अनेक तथ्यपूर्ण त्रुटी आहेत. प्रवक्त्याने सांगितलं, की संपूर्ण पत्रात केबीएलचा उल्लेख केलेला नाही. किर्लोस्कर ब्रदर्सचा वारसा हिसकावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.

हेही वाचाः गोंयकार राजकीयदृष्ट्या अत्यंत सूज्ञः अ‍ॅड. नरेंद्र सावईकर

नवीन किर्लोस्कर लोगोही स्वीकारला

या वर्षी 16 जुलैला अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्या नेतृत्वात पाच कंपन्यांनी आपापल्या व्यवसायांसाठी नव्याने प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली होती. या कंपन्यांसाठी नवीन ब्रँडची ओळख आणि रंग जाहीर केले गेले, त्याचप्रमाणे नवीन किर्लोस्कर लोगोही स्वीकारला गेला. या घोषणेच्या वेळी असं म्हटलं गेलं होतं, की हे रंग 130 वर्ष जुन्या नावाच्या वारशाचे प्रतिनिधित्व करतात.

हेही वाचाः चर्च पाडण्यामागे आम आदमीचं सरकार नाही

130 वर्षांचा वारसा असल्याच्या संजय यांच्या म्हणण्याला दोन्ही भावांनी आक्षेप घेतला आहे. त्यासंबंधात केबीएलने सेबीला पत्र लिहिलं आहे. पत्रात असं म्हटलं आहे, की केओईल, केआयएल, केपीसीएल आणि केएफआयएलची अनुक्रमे 2009, 1978, 1974 आणि 1199 मध्ये स्थापना झाली आणि त्यांचा 130 वर्षांचा वारसा नाही. या पार्श्वभूमीवर आता सेबी कार्पोरेट घराण्याच्या या वादावर काय निर्णय देतं ते पाहावं लागेल.

हा व्हिडिओ पहाः Video | ALLIANCE | विधानसभेसाठी लवकरच युतीची घोषणा?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!