VIDEO VIRAL: द ग्रेट खलीच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

मुलाचा अनोखा हेअर कट; व्हिडिओ झाला वायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: WWE या स्पर्धेत भारताचा पैलवान द ग्रेट खलीची चर्चा नेहमी असते. भारतात WWE च्या फॅन्सची संख्या मोठी आहे. त्यामुळे खलीच्या चाहत्यांची संख्याही मोठी असणं स्वाभाविक आहे. खलीचं खरं नाव दलीप सिंह राणा आहे. खली सोशल मीडियावर चांगलाच एक्टिव्ह असतो. इन्स्टाग्रामवर खली नेहमी पोस्ट करत असतो. आपला दिनक्रमही तो चाहत्यांसोबत शेअर करत राहतो. सोशल मीडियावर जसं लाईक्स मिळतं, तसं ट्रोलही केलं जातं. खलीने नुकतंच ट्रोलिंगला कंटाळून कमेंट सेक्शन बंद केला होता. आता खलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचाः 100 टक्के लसीकरण केलेलं पहिलं राज्य होण्याचं गोव्याचं उद्दिष्ट

एका व्हिडिओवर शेकडो कमेंट्स

या व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये खली एका मुलाचा हेअर कट करताना दिसतो. या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. काही लोक तर खलीकडे भलत्याच मागण्या करत आहेत. एकाने कमेंट केलीय, या मुलाला पकडून त्याचा ब्रश बनवा आणि बाथरुम साफ करा. दुसरा युजर म्हणतो, खली सर एक फूक मारा आणि याला टकला करून टाका, अशा भन्नाट कमेंट खलीच्या पोस्टवर केल्या जात आहेत.

द ग्रेट खलीची इन्स्टा पोस्ट 

सध्या WWE पासून दूर

आपल्या भव्य अशा उंचीमुळे प्रसिद्ध असणारा खली WWE मधील महत्त्वाच्या रेसलरमध्ये गणला जातो. खलीची उंची 7 फूट 1 इंच इतकी आहे. सध्या खली भारतातच असल्याने तो WWE मध्ये खेळत नाही. खलीने आपली शेवटची मॅच ऑक्टोबर, 2014 मध्ये रूसेव सोबत खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत खली एकही सामना खेळलेला नाही. WWE शिवाय खलीने प्रसिद्ध रिएलिटी शो बिग बॉसमध्ये देखील काम केले आहे. त्याचसोबत त्याने काही बॉलिवूड फिल्म्समध्येही काम केलं आहे. खलीने WWE च्या रिंगमध्ये अंडरटेकर, केन, बिग शो, जॉन सिना, ऑन मायकल यासारख्या खेळाडूंविरुद्ध सामने खेळले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!