संरक्षण मंत्र्यांनी केली ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चा

द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा घेतला आढावा; दोन्ही देशांमधील वाढत्या संरक्षण बंधाबद्दल संतोष

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्‍लीः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर ड्युटेन यांच्यासोबत 1 जून 2021 रोजी दूरध्वनीवरून चर्चा केली. सध्याच्या स्थानिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण संबंधांचा दोन्ही संरक्षणमंत्र्यांनी आढावा घेतला.

हेही वाचाः सीझेडएमपीसाठी पुन्हा जनसुनावणी घ्या!

दोन्ही संरक्षण मंत्र्यांचं एकमत

जून 2020 मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचे पालन करत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील संरक्षण भागीदारीने पुढची पायरी गाठली आहे, यावर दोन्ही संरक्षण मंत्र्यांचं एकमत झालं. मलाबार येथील संरक्षण सरावात ऑस्ट्रेलियाने घेतलेला सहभाग हा या वाढीव संरक्षण भागीदारीमधील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.

हेही वाचाः गोवा पोलिस कॉन्स्टेबल्ससाठी निवड चाचणी ‘या’ दिवशी

दोन्ही देशांमधील वाढत्या संरक्षण बंधाबद्दल संतोष

दोन्ही मंत्र्यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या संरक्षण बंधाबद्दल संतोष व्यक्त केला. विविध पातळ्यांवरील द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला तसंच दोन्ही लष्करांमधील सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मंत्री पातळीवर 2+2 संवाद आयोजित करण्यासंबंधी दोन्ही मंत्र्यांमध्ये बोलणं झालं.  कोविड-19 सोबत दोन हात करण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाने केलेल्या सहकार्याबद्दल राजनाथ सिंह यांनी यावेळी ऑस्ट्रेलियाला धन्यवाद दिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!