अरे बापरे! चिमुकल्यानं गिळला बल्ब, मात्र….

कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे जिवाचा धोका टळला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: एका ६ महिन्याच्या मुलीने बल्ब गिळल्यावर तिच्या जिवाला असणारा धोका कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे आता टळला आहे. एका ६ वर्षांच्या बाळाने खेळता- खेळता चक्क बल्बच तोंडाच्या आत घातला आहे. हा बल्ब तिच्या घशात अडकून बसल्यावर तिला त्रास होऊ लागला. अगोदर घरच्यांनी तो बल्ब बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यामध्ये त्यांना यश येत नव्हते. मग त्यांनी असा निर्णय घेतला, ज्यामुळे मुलीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

झारखंडच्या पलामू भागातील घटना

झारखंड मधील पलामू भागात एका ६ महिन्याच्या मुलीने खेळत असताना प्लॅस्टिकचा बल्ब पडलेला बघितला. त्याचा रंग आकर्षक वाटल्याने ती रांगत- खेळत त्याच्या जवळ गेली. तो बल्ब उचलून तिने तोंडात घातला आणि खाऊ लागली होती. यामुळे बल्ब तिच्या घशात गेला आणि अडकून बसला होता.

घशात मोठ्या प्रमाणात वेदना

घशात खूपच मोठ्या प्रमाणात वेदना होताना मुलगी रडू लागली. कुटुंबीय मुलीच्या जवळ धावत आले आणि नेमका प्रकार त्यांच्या लक्षामध्ये आला. सुरुवातीला घरच्या मंडळींनी मुलीच्या घशातील बल्ब काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो इतक्या विचित्र प्रकारे अडकला होता की तो काढता येत नव्हता. मुलीच्या वेदना वाढत होते आणि तिचा श्वास देखील गुदमरायला सुरवात झाली होती.

मुलाला तातडीने नेले रुग्णालयात

यामुळे तिच्या पालकांनी मुलाला तातडीने हुसैनबादच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याठिकाणी ड्युटीवर असलेल्या डॉ. विकास कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलीच्या घशातून हळुवारपणे बल्ब बाहेर काढला आणि मुलीची सुटका त्यातून झाली. हा बल्ब जवळपास २ इंच लांब होता. ते बघून सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

साधारणतः गंभीर प्रकरणांमध्ये खासगी हॉस्पिटलात रुग्णाला नेण्याचा कुटुंबीयांचा प्रयत्न राहत असतो. मात्र, सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलीचे प्राण वाचल्याने यापुढे आपण कोणत्याही आजारावर उपचाराकरिता इथेच येणार असल्याचा निर्धार मुलीच्या कुटुंबीयान कडून करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!