इतिहास घडला; जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाची कमान पूर्ण

चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाची कमान पूर्ण; भारतीय रेल्वेचा चमत्कार प्रत्यक्षात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या रेल्वे पूलाच्या कमानीचं काम पूर्ण झालंय. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती दिलीये. ४६७ मी लांबीची ही किमान कोकण रेल्वे कोर्पोरेशन लिमिटेडने बांधून पूर्ण केलीये. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये या पूलाचं बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल

जम्मू-काश्मीरला प्रगतीशील आणि समृद्ध राज्य करण्यासाठी केंद्र सरकार कसलीही कसर सोडत नाहीये. त्याअंतर्गत जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं बांधकाम याठिकाणी सुरू आहे. या पुलाची उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही मोठी आहे. जम्मू-काश्मीरच्या कौरी भागात हा जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल बांधला जात आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्पांतर्गत १११ किमी लांबीच्या य मार्गावर अनेक ठिकाणी भोगदे आणि पूल बांधण्यात येतायत. त्यामध्ये चिनाब नदीवर हा पूल बांधण्यात येतोय. या पूलाच्या ४६७ मीटर लांबीच्या भव्य कमानीचं काम सोमवारी पूर्ण झालंय.

३५९ मीटर उंच रेल्वे पूल

या चिनाब रेल्वे पुलाची उंची नदीच्या तळापासून ३५९ मीटर आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये स्थित आयफेल टॉवरची उंच ३२४ मीटर आहे. म्हणजेच आयफेल टॉवरपेक्षा हा रेल्वे पूल ३५ मीटर उंच असेल. या नदीवर बांधल्या जाणाऱ्या पूलाची लांबी १३१५ किलोमीटर असणारेय. ८ रिश्टल स्केल तीव्रतेचा भूंकप झाल्यास किंवा अतितीव्र स्फोट झाल्यास या पूलावर त्याचा काही परिणाम होणार नाहीये.

जगातील सर्वात उंच कमान

सध्या काश्मीरला जोडणारा उधमपूर ते कटरा हा २५ किलोमीटरचा मार्ग, बनिहाल ते क्वाझीगुंड हा १८ किलोमीटरचा मार्ग आणि क्वाझरीगुंड ते काश्मीर हा ११८ किलोमीटरचा मार्ग तयार आहे आणि गेल्या वर्षभरापासून वापरात आहे. त्यामध्ये कटरा ते बनिहाल हा मार्गच अडथळा होता. मात्र, आता चिनाब नदीवर झालेल्या पुलामुळे हा मार्गही जोडला गेलाय. चिनाब नदीवर हा पूल उभारण्यासाठी ९०० मीटरची कमान उभारण्यात आलीये. जगातील ही सर्वात उंच कमान आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!