महाराष्ट्रात दिवाळी पाडव्याला प्रार्थनास्थळं खुली

मंदिरं उघडणार : नियमावली पाळणं अनिवार्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवारपासून महाराष्ट्रातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं उघडण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही घोषणा केलीय. प्रार्थना स्थळांच्या समित्या आणि भाविकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन सरकारनं केलंय.

महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू असली, तरी मंदिरं उघडण्यास परवानगी नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने प्रार्थना स्थळंही खुली करावीत, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र नियम आणि शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

दरम्यान, या हा निर्णय आंदोलनाच्या इशार्‍यानंतर आणि उशिरा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी केलाय. हिंदू जनजागृती समितीनं या निर्णयाचं स्वागत केलंय.

पहा व्हिडीओ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!