‘या’ राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला

लॉकडाऊन पूर्णपणे हटवणारं पहिलं राज्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

हैदराबाद : तेलंगणातील के चंद्रशेखर राव यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत तेलंगणातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात आला आहे. रविवार 20 जूनपासून तेलंगणामध्ये सर्वकाही सुरू राहील. इतकंच नाही तर तेलंगणामध्ये ना नाईट कर्फ्यू , ना वीकेंड लॉकडाऊनचे नियम असतील. सरसकट संपूर्ण लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. पूर्णपणे लॉकडाऊन हटवणारं तेलंगणा हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. तेलंगणातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटली आहे. त्याबाबतचा अहवाल आरोग्य विभागाने दिल्यानंतर, तेलंगणा सरकारने तिथला लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला.

तेलंगणातील कोरोनाची सद्यस्थिती

तेलंगणामध्ये शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार, 1417 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्यचे आकडा 6,10,834 इतका पोहोचला. सध्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचं पाहून, तेलंगणा सरकारने लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील रुग्णसंख्येत घट 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 60,753 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेत असलेल्या 1,647 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात देशातील एकूण 97,743 कोरोना रुग्ण बरे होऊ घरी परतले. बुधवारी दिवसभरात देशात कोरोनाचे 62480 कोरोना रुग्ण सापडले होते. या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट ही समाधानाची बाब मानली जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!