TECHNO VARTA | Apple iPhone 15 : आज 12 सेप्टेंबरला अनावरण कार्यक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 12 सप्टेंबर | ह्यावर्षी Apple आपल्या वार्षिक अनावरण कार्यक्रमांत 6 नवीन उपकरण प्रस्तुत करणार आहे. त्याचबरोबर iOS 17, iPadOS 17, watchOS 10 आणि tvOS 17 यांची लॉंच डेट डिक्लेयर करतील. 4 नवीन iPhone चे मॉडेल iPhone 15, iPhone 15 plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि 2 apple watch चे model : Apple Watch Series 9 आणि Apple Watch Ultra 2 हे कार्यक्रमाचे ठळक मुद्दे असतील.
स्टीव जॉब्स यांनी 2007 मद्धे पहिल्या iPhone चे अनावरण केले व तेथून iPhone चा सुरू झालेला प्रवास आजही चालला आहे. चला तर ह्या iPhones ची टाईमलाईन पाहूया.
























पहिला iPhone जरी 2007 मध्ये अनावारीत झाला तरी त्याचा विकास 2004 मध्ये सुरू झालेला. अॅपल चा दूसरा iPhone म्हणजेच iPhone 3G, त्याच्या लाँचसह ऍपलने त्यांची लॉन्च-डे उपलब्धता 22 देशांमध्ये वाढविली आणि अखेरीस त्यांनी 70 देशा आणि प्रदेशांमध्ये हा फोन प्रसिद्ध केला. तर 2010 मध्ये iPhone 4 “world’s thinnest smartphone” म्हणून जाहीर केला व त्यात त्यांनी फ्रंट कॅमेरा दिला व त्याबरोबर facetime म्हणजेच विडियोकॉल चा फीचर ही प्रथमच बाजारात प्रस्तुत केला. iPhone 4s 2011 मध्ये Siri virtual assistant हा फीचर दिला. तर 2015 च्या iPhone 6s मध्ये 4K रेकॉर्डिंग ची क्षमता दिली. 2017 मध्ये iPhone 8 सिरीज बरोबर त्यांनी फोन चा होम बटन काढला व facial recognition चा सॉफ्टवेअर परिचित करून दिला. 2020 मध्ये iPhone 12 ला 5g नेटवर्क कनेक्टिव्हिटी व MagSafe वायरलेस मेगनेटिक चार्जिंग हे वाढवून दिले आणि बॉक्स मधून चार्जर काढून टाकला. तर 2022 मध्ये आलेल्या iPhone 14 ला ESim, सॅटलाइट फोन एमर्जन्सि कॉलिंग व Dynamic Island असे फीचर प्रस्तुत केले.
कडून काय अपेक्षित असावे ?
नवीन फोन मध्ये टायटॅनियम फ्रेम असण्याची शक्यता आहे ज्याने iPhone ची बॉडी मजबूत आणि टिकाऊ होईल. त्याच बरोबर एक प्रमुख बदल म्हणजे अॅपल लायटनिंग केबल च्या एवजी C-type चार्जिंग केबल असेल. तसेच जो सायलंट मोड साठी बटन येत होता तो आता बदलून अॅक्शन बटन केला जाईल. ह्या गोष्टी गृहतीक असून Apple च्या औपचारिक अनावरण कार्यक्रमानंतरच विश्वासाने सांगता येतील.
