भारतीय संघाचं ‘टी 20’ विश्वचषकातील वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारत-पाकिस्तान कधी भिडणार

भारताचा सामना कधी कोणाशी? पाहा एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाचं वेळापत्रक नुकतंच आयसीसीने जाहीर केलं आहे. आधी भारतात खेळवण्यात येणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील दमदार संघापैकी एक असणाऱ्या भारतीय संघाचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत असणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघाच्या चाहत्यांसह विश्व क्रिकेट वाट पाहत असलेल्या या सामन्याची पर्वणी क्रिकेटप्रेमींना स्पर्धेच्या सुरुवातीलाच पाहायला मिळणार आहे.

हेही वाचाः खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसंच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार आहे. या सर्वांच्या सामन्यांना 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. भारत सर्वात आधी पाकिस्तान सोबत 24 ऑक्टोबर रोजी भिडेल. ज्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दमदार संघामध्ये 31 ऑक्टोबरला सामना होईल. ज्यानंतरचे भारताचे सामने तितक्या ताकदवर संघाशी नसतील. 3 नोव्हेंबरला भारत  अफगाणिस्तानशी भिडेल. ज्यानंतर 5 आणि 8 नोव्हेंबर रोजी ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 आणि ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2 यांच्याशी भारताचा सामना असेल.

टी-20 विश्वचषकात रंगणार सुपर 12 चा थरार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 12 संघामध्ये रंगणाऱ्या विश्वचषकाच्या थरारात सुपर 12 स्टेजमध्ये  ग्रुप 1 मध्ये 6 आणि ग्रुप 2 मध्ये 6 संघ आपआपसांत भिडणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी 4 संघ आधीच निवडले असून इतर चार संघ हे दोन ग्रुप स्टेजेसच्या सामन्यांतून क्वॉलीफाय होऊन स्पर्धेत एन्ट्री घेणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये ग्रपु A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नाम्बिया आणि नेदरलँड हे संघ आहेत. तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, स्कॉटलँड, ओमन आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | DELEVOPMENT | विकास प्रकल्पांना सरकारचं प्राधान्य : मुख्यमंत्री

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!