करा सर्जरी! आयुर्वेदीक डॉक्टरांना केंद्र सरकारची परवानगी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : मोदी सरकारनं एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. आता आयुर्वेदीक डॉक्टरही सर्जरी करु शकणार आहेत. केंद्रानं याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेमध्ये आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अर्थातच मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयमुळे काही लोकांकडून आश्चर्यही व्यक्त केलं जातंय.
हाडांचे आजार, डोळ्यांचे विकार, नाक-कान-घसा आणि दातांसंबंधी निगडीत सर्जरी यापुढे आयुर्वेदीक डॉक्टरांना करता येणार. महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या अध्यक्षांनी अशा सर्जरी गेल्या २५ वर्षांपासून गेल्या जात असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे अधिसूचनेत फक्त आता या सर्जरी वैध असणार असल्याचं स्पष्ट केलंय.
19 नोव्हेंबरला याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आल्याचं वृत्त आहे. त्याप्रमाणे आता आयुर्वेदाच्या पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमात या सर्जरीचाही समावेश करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.
महत्त्वाची बाब म्हणजे या निर्णयामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायल्या मिळत आहेत. आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी म्हटलंय की, यामुळे डॉक्टरांमध्ये खिचडीसारखी परिस्थिती निर्माण होईल. तर दुसरीकडे आयुर्वेदाच्या डॉक्टर्समध्ये आनंदाचं वातावरण आहे.