नौदलाची ताकद वाढली! सुपरसोनिक क्रूझ मिसाईलचं यशस्वी परीक्षण

सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने साधला टार्गेटवर अचूक निशाणा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

चेन्नई : भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे सुपसोनिक क्रूझ मिसाईलचं परीक्षण यशस्वी झालंय. चेन्नईतमध्ये रविवारी (18 ऑक्टोबर) सुपरसोनिक क्रूझ मिसाईलचं परीक्षण करण्यात आलं. देशासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष या परीक्षणाकडे लागलं होतं.

भारतीय नोदलाच्या स्वदेशी स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नईतून ब्रह्मोस सूपरसोनिक क्रूज मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आलं. या परीक्षणादरम्यान अरबी समुद्रात एक टार्गेट ठरवण्यात आलं होतं. या टार्गेटवर निशाणा लावत सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने अचूक वेध घेतला. या यशस्वी परीक्षणामुळे भारताला युद्धादरम्यान मोठी मदत मिळणार आहे.

सर्वात शक्तिशाली मिसाईल

जगातील सर्वाधिक शक्तिशाली मिसाईल म्हणून सुपरसोनिक क्रूझ मिसाईल ओळखलं जातं. हे मिसाईल पाणबुडी तसंच लढाऊ विमानातूनही डागलं जाऊ शकतं. या मिसाईलचे पहिलं यशस्वी परीक्षण 11 मार्च 2017 रोजी करण्यात आलं होतं. 2019 मध्ये चांदीपूरमधील आईटीआरपासून ब्रह्मोसचे जमिनी परीक्षण यशस्वी झालेलं.

टार्गेटवर अचून निशाणा

सुपरसोनिक तब्बल चारशे किलोमीटर दूरपर्यंत मारा करु शकतं. डीआरडीओ आणि रशियाच्या एरोस्पेस उपक्रम एनपीओएमने संयुक्तरित्या मध्यम रेंजची सूपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाईल बनवलंय. आज चाचणी करण्यात आलेलं सुपरसोनिक मिसाईल अरबी समुद्रातील लक्ष्याला पीन-पॉईंट ऍक्युरेसीनं धडकलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!