महाराष्ट्रात कडक निर्बंध; तूर्तास लॉकडाऊन नाही

३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करणार नाही; कडक निर्बंध लागू करण्यावर एकमत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करणार नाही, असं सांगण्यात आलंय. मात्र, कडक निर्बंध लागू करण्यावर एकमत झाल्याचे सुत्रांनी सांगितलंय. यामुळे राज्यावरील लॉकडाऊनची टांगती तलवार तात्पुरती टळली आहे, असंच म्हणावं लागेल.

५ एप्रिलपासून कडक नियम लागू

राज्यात ५ एप्रिलपासून कडक नियम लागू होणारेत. रात्री ८ पासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणारेय. दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. यामध्ये त्यांनी राज्यात कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती वाईट झालीये, यामुळे सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. यावर दोन्ही नेत्यांकडून सरकारला अपेक्षित सहकार्य करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. यानंतर मनसेने सर्व नेत्यांना कोरोनावरील सरकार उचलत असलेल्या पावलांना विरोध करू नये, असे आदेशही देण्यात आलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!