बेळगावात कडक लॉकडाऊन जाहीर; 7 जूनपर्यंत बाजारपेठा बंद

गोव्याच्या भाजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव सरकारने रविवार 30 मे पासून बेळगावात कडक लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली आहे. रविवारी सकाळी ६ ते सोमवारी 7 जूनपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या काळात आवश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद ठेवणार असल्याचं बेळगाव प्रशासनाने जाहीर केलंय.

हेही वाचाः MONSOON UPDATE: ठरलेल्या वेळेत राज्यात मान्सूनचं होणार आगमन

7 जूनपर्यंत बेळगाव बंद

रविवारपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बेळगावचं होलसेल भाजी मार्केट बंद असणार आहे. सोमवार 7 जून रोजी सकाळी 10 वाजता हे मार्केट  पुन्हा सुरू होणार आहे. दूध, किराणा आणि जीवनावश्यक वस्तू सोडल्यास संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवणार असल्याचं कर्नाटक सरकारने जाहीर केलंय.

हेही वाचाः CURFEW | गोव्यात ७ जूनपर्यंत कर्फ्यू वाढवला

गोव्याच्या भाजी पुरवठ्यावर परिणाम

कोरोनाने सामान्य माणसाचं जगणं नकोसं करून सोडलंय. कोरोनामुळे महागाई वाढलीये. अगोदर भाजीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात आता बेळगाव सरकारने 7 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे बेळगावहून गोव्यात येणारी भाजी बंद होणार आहे. त्यामुळे गोव्याच्या भाजी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. तसंच भाजीचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः आयपीएलचे उर्वरित सामने आता ‘यूएई’मध्ये होणार !

महिन्याभरापासून बेळगाव होलसेल भाजी मार्केट तणावात

दीड-दोन महिन्यांपासून बेळगावात कोविडचा प्रादुर्भाव वाढतोय. कोविड बाधितांची संख्याही वाढतेय. सोशल डिस्टन्सिंग रहावं म्हणून बेळगावातील होलसेल भाजी मार्केट दोन ठिकाणी विभागण्यात आलं होतं. यामुळे भाजी विक्रेत्यांना अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे 15-20 दिवसांपूर्वी भाजी विक्रेत्यांनी बंद पुकारला होता. त्यानंतर कर्नाटक सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाने मागच्या आठवड्यापासून विकेंड लॉकडाऊन जाहीर केला असून बेळगाव जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी कडक निर्बंध लादलेत.

हेही वाचाः तुयेवर अन्याय नाही; पण आयआयटीचं पेडणे तालुक्यात स्वागत

बेळगावातील कोविड परिस्थिती

दीड महिन्यापासून बेळगावात कोरोनाने धुमाकूळ घातलाय. मागच्या 15 दिवसांत दिवसाकाळी 1200 ते 1500 कोविड बाधित सापडत आहेत. शुक्रवारी 1319 रुग्णांचे कोविड अहवाल पॉझिटिव्ह आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!