VIRAL VIDEO | कोटामध्ये दिवसाढवळ्या दुकानदारावर झाडल्या गोळ्या

भीतीदायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झालं कैद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील गुमानपुरा भागात 3 सशस्त्र तरुणांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. इतकंच नाही तर या घटनेचा खळबळजनक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

हेही वाचाः म्हापशातील ‘टीका उत्सवा’चा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

3 तरुणांनी केली दिवसाढवळ्या फायरिंग

वायरल व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, दोन दुचाकींवरुन 3 तरूण उतरले आणि अचानक पिस्तुल काढून फायरिंग करू लागले आणि पुन्हा गाडीवर बसून निघून गेले. या तरुणांनी मंडईतील दुकानदाराला लक्ष्य केलं आणि फायरिंग सुरू केलं. फायरिंगच्या दरम्यान दुकानदार दुकानातच होता. 

हेही वाचाः आयसीएसआयच्या गोवा चॅप्टरकडून रक्तदान शिबिराचं आयोजन

पोलिस तपास सुरू

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहेत आणि गोळीबार करणाऱ्या तरुणांना पकडण्यासाठी त्यांचा शोध घेणं सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की ज्याच्यावर हल्ला झाला त्या व्यक्तीची ओळख कैलाश मीणा आहे. वास्तविक, सोमवारी सकाळी 11 वाजता तीन हल्लेखोर कैलास मीना यांच्या दुकानाबाहेर आले आणि त्यांनी त्याचं नाव घेतलं, त्यानंतर तो बाहेर आला. दरम्यान, हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य करुन 5 राउंड गोळ्या झाडल्या. पण तो बचावला. 

हेही वाचाः सत्तरीतल्या पोर्तुगीजकालीन ‘कादय’ दुर्लक्षीत, संवर्धनाबाबत सरकारी अनास्था

दुकानदार बचावला

अनेक वेळा गोळीबार करूनही कैलास मीना वाचले. त्यामुळे सर्व हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. कैलास मीना कमिशन एजंट म्हणून फळे, भाज्या व धान्य खरेदी व विक्री करतात. कैलास मीनांतं कोणाशीही वैर नसल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांनी हल्लेखोरांची ओळखही नाकारली आहे. पोलिसांचे म्हणणं आहे की सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ओळखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप त्यांच्या हल्ल्यामागील हेतू समोर आलेला नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!