Delhi Murder : पतीला संपवून मृतदेहाचे तुकडे ठेवले फ्रिजमध्ये; असा झाला खूनाचा उलगडा…

सून, सावत्र मुलीवर वाईट नजर ठेवल्याने घेतला निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असतानाच या प्रकरणाशी साधर्म्य असलेली आणखी एक घटना समोर आली आहे. दिल्लीतील त्रिलोकपुरी येथील अंजन दास यांची हत्या केल्यानंतर त्याच्याही मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. त्यांच्याच पत्नी व सावत्र मुलाने ही हत्या केली.
हेही वाचाः‘इलेक्ट्रिक टॅक्सींच्या ॲप’ सेवेसाठी प्रस्ताव!

हत्येपूर्वी अंजान यांना दारू पाजण्यात आली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनची वाईट नजर त्यांच्या सावत्र मुलाची बायको आणि घटस्फोटित सावत्र मुलीवर पडली होती. त्यामुळे संतप्त पत्नी आणि सावत्र मुलाने मिळून हे हत्याकांड घडवून आणले. हत्येनंतर तुकडे करून मायलेकाने दिल्लीच्या विविध भागात फेकले. ३० मे रोजी ही हत्या केली. हत्येपूर्वी अंजान यांना दारू पाजण्यात आली. दारूमध्ये काही ड्रग्ज मिसळण्याच आले होते.
हेही वाचाःकेरळमध्ये पोलीस स्थानकावर हल्ला…

बिहारात अंजनचे आधीच लग्न झालेले

डीसीपी (क्राईम) अमित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अंजन दास हा मूळ बिहारचा रहिवासी होता. त्याचे तिथे आधीच लग्न झाले होते. अंजन दास लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करायचा. एवढेच नाही, तर अंजनला आधीच ८ मुले होती. पूनम ही त्याची दुसरी पत्नी होती. २०११ मध्ये पूनम अंजनला भेटली होती. दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले. पूनमसोबत लग्नानंतर त्याने तिचे दागिने विकून पैसे बिहारलाही पाठवले होते. मात्र सावत्र सून (दीपकची बायको) आणि सावत्र मुलगी यांच्यावर वाईट नजर असल्याने अंजनला जीवे ठार मारण्याचा कट रचला गेला.
हेही वाचाःब्रिटीश पित्यासह रशियन कन्येला ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक…

सुखदेव तिवारीला शोधत पूनम बिहारहून दिल्लीत

दिल्लीचे स्पेशल सीपी रवींद्र यादव यांनी सांगितले की, दीपक हा ना अंजन दासचा मुलगा होता. पूनमचा नाही. १३-१४ वर्षाची असताना पूनम हिचा विवाह सुखदेव तिवारी यांच्याशी झाला होता. सुखदेव तिवारीपासून तिला एक मुलगी झाली. सुखदेव तिवारी यांनी दिल्लीत आल्यानंतर पूनमशी संपर्क तोडला. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी पूनम बिहारहून दिल्लीत आली. तिला सुखदेव तिवारी सापडला नाही. मात्र त्याचा शोध घेत असताना कल्लू सापडला. त्यानंतर ती कल्लूसोबत राहू लागली. कल्लूलाही तीन अपत्य-दोन मुली आणि एक मुलगा दीपक. तिथे राहत असताना कल्लूने दारुच्या नशेत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अंजन दासशी तिची ओळख झाली. अंजनसोबत राहू लागली. अंजनचे बिहारमध्ये दुसरे कुटुंब आहे, हे तिला माहिती नव्हते.
हेही वाचाःघाटेश्वरनगर-खोर्ली येथे बस कलंडली…

अंजन बायको आणि बहिणीवरही वाईट नजर ठेवू लागला

दीपकचे लग्न झाल्यावर अंजनने दीपकच्या पत्नीवर तसेच दीपकच्या घटस्फोटित बहिणीवरही ठेऊ लागला. ती बहीणही इथेच राहायची. अंजन बायको आणि बहिणीवरही वाईट नजर ठेवू लागला. त्यामुळे दीपकने अंजन दासला ठार मारण्याची योजना आखली. सर्व पुरावे नष्ट करण्याचीही त्याने योजना आखली.      
हेही वाचाःपुराव्याअभावी सातही संशयित आरोपमुक्त…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!