Video | एकीचं बळ! दरीत पडलेल्या ट्रकला वाचवण्यासाठी अख्खा गाव एकवटला

थोडक्यात मोठा अनर्थ टळला!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एकीचं बळ ही गोष्ट लहानपणी सगळ्यांनीच ऐकली, वाचली असेल. पण त्याची प्रचिती फार कमी वेळा येते. नागालॅन्डमधील लोकांनी एकीचं बळ काय असतं हे दाखवून दिलंय.

एक ट्रक खोल दरीत पडण्यापासून गावकऱ्यांनी वाचवलंय. अपघात झाल्यानंतर हल्ली फोटो काढणाऱ्यांचीच गर्दी पाहायला मिळते. पण नागालॅन्डमध्ये असं घडलं नाही. अपघातग्रस्त ट्रकला वाचवण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. इतकंच नाही, तर दरीत कोसळणाऱ्या ट्रकला बाहेरही काढलं. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेमुळे नागालॅन्डमधील या गावातील लोकांचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

त्याचं झालं असं की मालवाहू ट्रक एका वळणावर दरीत कोसळला होता. अर्धवट रस्त्याच्या कठड्यावर अडकलेला हा ट्रक कोणत्याही क्षणी दरीत कोसळण्याची भीती होती. मात्र गावकऱ्यांनी एकत्र दोरखंडाच्या साथीनं ट्रकला वर खेचलं. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!