उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या आदरातिथ्याने भारावले पालकमंत्री !

संदिप देसाई | प्रतिनिधी
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच दोडामार्ग तालुका दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष आदरातिथ्य करण्याची संधी दोडामार्ग शहरातील उद्योजक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांना मिळाली. खास नाईक यांच्या घरी हे आपुलकीचे आदरातिथ्य घेतल्यानंतर उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्य व शहाराच्या विकासासाठी ते देत असलेल्या योगदानाबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष कौतुक केले.
पालकमंत्र्यांसमवेत भाजपचे पदाधिकारी उपस्थित
सुशीला हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमासाठी ग्रीन व्हीलेज मध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं आगमन होताच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या उपस्थितीत विवेकानंद नाईक यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यांनंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाईक यांनी आपल्या निवास्थानी आदरातिथ्य केल. यावेळी पालकमंत्री यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, रमांकात जाधव, रंगनाथ गवस आदि उपस्थित होते.
सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रमासाठी गेली ३०-४० वर्षे नाईक यांचं योगदान
यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी विवेकानंद नाईक यांचे दोडामार्ग शहर विकासासाठी भरीव योगदान असल्याच सांगत त्यांनी शहारासाठी दिलेली मोफत शववाहिका, ग्रामीण रुग्णालायसाठी दिलेला पाण्याचा पंप, अनेक सामाजिक व सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रम यासाठी गेली ३०-४० वर्षे नाईक यांचं योगदान राहिल्याच आवर्जून सांगितलं. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही नाईक यांचं या योगदांनाबद्दल व नाईक यांनी आपुलकिने केलेल्या आदरातिथ्याच विशेष कौतुक केल.