‘जॉन्सन बेबी पावडर’चा परवाना कायमचा रद्द

कंपनीच्या मुलुंड उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा उत्पादन परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.
हेही वाचा:रत्नागिरीत जहाजावरील १९ जणांना तटरक्षकांनी असे दिले ‘जीवदान’…

उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्याचे कारण देत परवाना रद्द

या प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांना गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्याचे कारण देत हा परवाना रद्द करण्यात आला आहे. ‘जॉन्सन बेबी पावडर’चा प्रामुख्याने नवजात बालकांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो.
हेही वाचा:विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसच्या हातून निसटले!

शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता

उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे या उत्पादनाचा सामू हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या मुलुंड उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा:PM Modi Birthday Special : १,२१३ चहाच्या कपांच्या मदतीने वाळूशिल्प साकारत मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!