‘प्रबोधनकार डॉट कॉम’ संकेतस्थळाचं लोकार्पण…

प्रबोधनकारांचे समग्र साहित्य संकेतस्थळावर उपलब्ध

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणासाठी ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ https://prabodhankar.com/ या संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा मुंबईच्या दादरमध्ये पार पडला. ‘प्रबोधन प्रकाशन’चे प्रबोधनकार डॉट कॉम हे संकेतस्थळ नव्या स्वरूपात येत आहे.
हेही वाचाःशापोरा नदीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह…

उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर

संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळ्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक सचिन परब कार्यक्रमास उपस्थित होते.
हेही वाचाःसोलापूर, अक्कलकोटही कर्नाटकात समाविष्ट करावेत…

प्रबोधनकारांचे समग्र साहित्य संकेतस्थळावर उपलब्ध

नव्या स्वरूपातील संकेतस्थळ ‘प्रबोधनकार डॉट कॉम‘ मोबाईल आणि सोशल मीडिया फ्रेंडली असेल. प्रबोधनकारांचे समग्र साहित्य या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. प्रबोधनकारांची सर्व पुस्तके, पुस्तकबद्ध न झालेले साहित्य, विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख, त्यांनी पुस्तकांसाठी लिहिलेल्या प्रस्तावना या संकेतस्थळावर वाचता येतील. प्रबोधनकारांचे थोडक्यात चरित्रही मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा भाषांमध्ये उपलब्ध होईल.
हेही वाचाःShraddha murder case: श्रद्धाच्या मारेकऱ्याला होईल कठोर शिक्षा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!