भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने चौघांना चिरडले…

एका अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना तुडवले

Goan Varta Live | प्रतिनिधी

दिल्ली : अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशात दिल्लीतील सीमापुरी इथे मंगळवारी रात्री उशिरा एका अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना तुडवले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा:कर्तव्य बजावताना अग्नीशमन दलाच्या फायर फायटरचा मृत्यू…

रुग्णालयात दाखल करण्यात नेत असताना मृत्यू

या अपघातामध्ये दोन जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात नेत असताना मृत्यू झाला. मंगळवार-बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास डीटीसी डेपोच्या रेडलाईटजवळ हा अपघात झाला.
हेही वाचा:नेपाळ सिमेजवळ आवळल्या मुसक्या…वाचा ‘नूर अहमद’ नेमकं प्रकरण आहे तरी काय?

चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार

या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमासुपारी भागात रात्री १ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास काही लोक दुभाजकार झोपले असता भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडले.
हेही वाचा:सिक्वेरांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!