COVID-19 ALERT | सिंधुदुर्गात सक्तीचं कॉरंटाईन..

नियम पाळा नाहीतर दाखल होणार गुन्हा - पालकमंत्री उदय सामंत

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्या चाकरमानी व अन्य लोकांसाठी चेक नाके, रेल्वे स्टेशन व आरोग्य विभागामार्फत कॉरंटाईन करण्याचे शिक्के मारण्यात येतील. संबंधितांनी १४ दिवसांचे पालन करावयाचे आहे. नियम मोडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड हॉस्पिटल अन्य ठिकाणी हलवण्यात येईल. याबद्दल ताबडतोब मी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी बोलतो, असे आश्वासनही त्यांनी दिले. पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा आहे. तरीदेखील कोल्हापूर व रायगड या ठिकाणाहून अधिकचा ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. दररोज ऑक्सिजनचे मोठे ६० बाटले आमच्या ऑक्सिजन प्लांटवर उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध आहेत. तरी देखील कोविड केअर सेंटर असलेल्या काही ठिकाणी ऑक्सिजन बेड तयार करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना सोयीचे होईल, असे नियम आणि नियोजन सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी करावेत, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!