यंदा विजेचा तुटवडा भासणार : या उन्हाळ्यात त्रास वाढू शकतो, एप्रिल महिन्यात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता
वीज कपात: देशात ज्या दराने विजेची मागणी वाढली आहे त्या प्रमाणात कोळशावर आधारित नवीन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेले नाहीत. तसेच अनेक प्लांटचे काम 10 वर्षे विलंबाने सुरू आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

उन्हाळ्यात पॉवर कट: येत्या एप्रिल महिन्यात, तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो कारण वीज खंडित झाल्यामुळे तुमचा एसी, कुलर किंवा पंखा रात्री चालवू शकत नाही. मार्च महिन्यापासूनच देशात तापमान वाढू लागले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही विजेची मोठी मागणी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अडचण अशी आहे की कोळशावर चालणारे नवीन वीज प्रकल्प उभारणीस होणारा विलंब आणि कमी जलविद्युत निर्मितीची क्षमता यामुळे या उन्हाळी हंगामात विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लोकांना कडक उन्हाळ्यात खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागू शकतो.
रात्री वीज खंडित होण्याची शक्यता!
रॉयटर्सच्या अहवालानुसार, दिवसा सौर उर्जेमुळे विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत झाली आहे. परंतु कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रे ही जास्त नसल्यामुळे आणि जलविद्युतद्वारे वीजनिर्मिती होत नसल्यामुळे सौरऊर्जा उपलब्ध नसताना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे संकट येऊ शकते. फेडरल ग्रिड रेग्युलेटर ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडियाच्या अंतर्गत अहवालानुसार, एप्रिल 2023 मध्ये नॉन-सोलर वेळेत सर्वाधिक मागणीच्या तुलनेत 1.7 टक्के कमी वीज उपलब्ध होईल. या वर्षी एप्रिल महिन्यात रात्रीच्या वेळी संभाव्य 217 GW विजेची मागणी दिसून आलीये , जी गेल्या वर्षीच्या एप्रिल 2022 च्या तुलनेत 6.4 टक्के अधिक आहे. अशा स्थितीत यंदाच्या उन्हाळ्यात विजेचे संकट ओढावू शकते.

कोळसा, आण्विक आणि वायूद्वारे वीजनिर्मिती केल्याने रात्रीच्या वेळी एकूण मागणीच्या 83 टक्के वीजपुरवठा सुनिश्चित होईल. उर्वरीत वीज पुरवठा करण्यात जलविद्युत प्रकल्प प्रमुख भूमिका बजावतील. तथापि, गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत या एप्रिलमध्ये जलविद्युतद्वारे 18 टक्के कमी वीजपुरवठा होण्याची शक्यता ग्रिड इंडियाने वर्तवली आहे.
‘या’ कारणांमुळे नवीन पॉवर प्लांटच्या बांधकामाला विलंब
खरं तर, मागणी-पुरवठ्यात प्रचंड तफावत असल्यामुळे कोल-बेस्ट पॉवर प्लांटच्या उभारणीला विलंब होत आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, 16.8 GW क्षमतेच्या 26 कोळशावर आधारित वीज प्रकल्पांचे बांधकाम एक वर्षाच्या विलंबाने सुरू आहे. तर असे काही वीज प्रकल्प आहेत जे पूर्ण होण्यास १० वर्षांपेक्षा जास्त उशीर झाला आहे.