कर्नाटकमधील शहरांना आता जोडणार ऑलेक्ट्राच्या प्रदुषण मुक्त इ बसेस

ऋषभ | प्रतिनिधी
बेंगळुरू, 31 डिसेंबर 2022: कर्नाटक राज्यातील प्रवाशासाठी नव्या वर्षाच्या सुरवातीलाच एक चांगली बातमी. बेंगळुरू आणि म्हैसूर, शिमोगा, दावणगेरे, चिक्कमंगलुरू, विराजपेटे आणि मडीकेरे दरम्यान नव्याकोऱ्या पर्यावरण पुरक इ बसेस आता धावू लागतील. कर्नाटकचे परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू यांनी 12 मीटर, वातानुकूलित, ऑलेक्ट्रा ई-बस प्रीमियम लक्झरी प्रोटो इलेक्ट्रिक बसला आज हिरवा झेंडा दाखवला. केएसआरटीसीचे अध्यक्ष एम. चंद्रप्पा आणि एमडी व्ही. अंबू कुमार, केएसआरटीसीचे संचालक मंडळ आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारतीय इ बसेस मोबीलीटीमधील आघाडीची कंपनी Olectra Greentech Limited (OGL) आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) यांच्या सहकार्यातून हा उपक्रम प्रत्यक्षात उतरला आहे. 12-मीटर वातानुकूलित बसेसची आसन क्षमता 43 + 1 चालक अशी आहे. इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशनमूळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाची अनुभूती मिळते. प्रत्येक ई-बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, आपत्कालीन बटण, अग्निशामक उपकरण, प्रथमोपचार किट आणि तातडीच्या प्रसंगी वापरायचा हातोडा यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हाय-पॉवर फास्ट चार्जिंग सिस्टम 2-3 तासांमध्ये बॅटरी पूर्णपणे रिचार्ज करते. ई-बस एका चार्जवर वाहतूक आणि प्रवासी भार या परिस्थिती या नुसार 300 किमी पर्यंत प्रवास करू शकते. ई-बसमध्ये आरामदायी लक्झरी पुश-बॅक सीट आहेत. टीव्ही आणि इन्फोटेनमेंट यंत्रणा, प्रत्येक आसनाला USB चार्जर आणि सामान ठेवण्याची प्रशस्त जागा अशा सुविधा आहेत .

ऑलेक्ट्राने आजपर्यंत विविध राज्यांमध्ये 1,000 हून अधिक बसेस वितरित केल्या आहेत. ऑलेक्ट्रा बसच्या मनाली ते रोहतांग पास या डोंगराळ भागात प्रवास करण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे.
श्री के.व्ही. प्रदीप, सीएमडी, ऑलेक्ट्रा यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) उपक्रमातर्फे या ऑलेक्ट्रा ई-बसेस राज्यभरातील 7 डेपोतून आपली प्रदुषणरहित, आरामदायी, आवाजरहित सेवा देण्यास सज्ज असल्याचे सांगीतले.