…अखेर गोमंतकीयांना दोडामार्गात मिळणार लस

राजेंद्र म्हापसेकर यांनी खडसावलं प्रशासनाला !

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्ग : 18 ते 44 वयोगटातल्या गोमंतकीयांना दोडामार्गात लस नाकारण्यात आली होती. यासंदर्भात संबंधित गोमंतकीय नागरीकांनी दोडामार्गचे तहसीलदार अरूण खानोलकर यांच्याशी चर्चा केली. हा निर्णय जिल्हा शल्य चिकीत्सकांचा असल्यानं आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नसल्याचं तहसिदारांनी स्पष्ट केलं. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात थेट जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधला. चर्चेदरम्यान आज नोंदणी केलेल्या गोमंतकीयांना लसीकरण करण्यात येईल. तशा सुचना दोडामार्ग आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या. याबददल राजेंद्र म्हापसेकर यांचे गोमंतकीयांनी आभार मानलेत. दरम्यान, गोमंतकीयांना लस देता येत नसेल तर त्यांना तशी लेखी सुचना देण्यात यावी. कोणतेही तोंडी आदेश खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!