…. म्हणून मुलाने अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार

बिहारमधील दरभंगा परिसरातली घटना; मुस्लीम तरुणाने दिला अग्नी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोना काळात जीवितहानी, आर्थिक हानी तर झालीच. पण त्याचबरोबर आपली असणारी माणसंही एकमेकांपासून दुरावली गेल्याचा प्रकार घडलाय. पण दुसरीकडे काही परक्यांनी आपलंस केल्याच्या घटनाही समोर आल्यात. बिहारमधी दरभंगा परिसरातही अशीच काहीशी घटना घडलीये. कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या मुलाने मृतदेह घेण्यास नकार दिलाय. शेवटी एका मुस्लीम तरुणाने मुलाची भूमिका पार पाडली आणि त्या पित्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत.

मृतदेह नेण्यासाठी आमच्याकडे माणसं नाहीत…

दरभंगामध्ये असणाऱ्या डीएमसीएच रुग्णालयाने संबंधित मृत व्यक्तीच्या मुलाला त्यांच्या मृत्यूबद्दल कळवलं, पण मुलाने मोबाइलच बंद केला. त्याने कोरोनाच्या भीतीपोटी वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार दिला. शेवटी कबीर संस्थानने पुढाकार घेतला आणि या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले. या संस्थेमध्ये असणाऱ्या एका मुस्लीम तरुणाने हिंदू पद्धतीप्रमाणे या वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार केल्याची घटना घडलीये. मुलाने या निवृत्त वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यास असमर्थता दाखवली. त्याने रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहित याबाबत माहिती दिली. त्यात त्याने असं म्हटलं होतं की, मृतदेह नेण्यासाठी त्याच्याकडे माणसं नाहीत. या पत्रानंतर त्याने फोन बंद ठेवला होता. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.

हेही वाचाः कोरोनाला अटकाव करत पर्यटन क्षेत्र सुरू राहणं गरजेचं

एक मुलगा सोडल्यास सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह

संबंधित मृत व्यक्ती कमतौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पीडारुच गावातील आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे. मात्र एक मुलगा सोडल्यास सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह होते. त्याच मुलाने त्यांचा मृतदेह घेण्यास नकार दिला, तेव्हा कबीर सेवा संस्थानाला या घटनेची माहिती देण्यात आली.

हेही वाचाः स्कूटीचा अपघात, एक जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

कबीर सेवा संस्थानच्या मोहम्मद उमरने केले अंत्यसंस्कार

या संस्थेच्या मोहम्मद उमर यांनी एक व्हिडीओ जारी करत अशी माहिती दिलीये की त्यांनी आता सेल्फ क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतलाय. जेणेकरून इतर कुणाला याची बाधा होणार नाही. शिवाय त्यांनी असंदेखील आवाहन केलंय की कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाहीये, तर योग्य गाइडलाइन्सचं पालन करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी या व्हिडीओतून माहिती दिलीये की संस्थेतील काही हिंदू लोकांच्या मदतीने त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीवर अत्यंसंस्कार केलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!