माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन

कोरोनामुळे निधन; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: प्रख्यात वकील, देशाचे माजी अटॉर्नी जनरल पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 91 वर्षाचे होते. सोली सोराबजी यांची ओळख एक तत्वनिष्ठ आणि मधुर व्यक्तीमत्व अशी होती. त्याच्या निधनावर देशातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

हेही वाचाः पंडित योगराज नाईक यांचे निधन

1989 ते 1990 या काळात देशाचे अटॉर्नी जनरल

सोली सोराबजी यांचं पूर्ण नाव सोली जहांगीर सोराबजी असं आहे. त्यांचा जन्म 1930 साली मुंबईमध्ये झाला. 1953 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिसला सुरुवात केली. सोली सोराबजी 1971 साली सर्वोच्च न्यायालयात सीनियर काऊन्सलिंग झाले. सोली सोराबजी हे 1989 ते 1990 या काळात देशाचे अटॉर्नी जनरल होते. त्यानंतर पुन्हा एकदा 1998 ते 2004 या काळात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. 

हेही वाचाः १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला होऊ शकतो उशीर?

प्रख्यात वकील म्हणून ओळख

सोली सोराबजी यांची ओळख देशातील एक प्रख्यात वकील अशी होती. त्यांची गणना जगातील मोठ्या मानवाधिकार वकिलांच्या यादीतही होत होती. नायजेरिया देशातील मानवाधिकाराच्या उल्लंघनाबद्दल माहिती घेण्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्राने 1997 साली विशेष दूत म्हणून पाठवलं होतं. 

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान

सोली सोराबजी यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारच्या वतीनं त्यांचा पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!