फडणवीस, अजितदादा, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यानंतर आता स्मृति इराणींचा नंबर, कोरोना +ve

बड्या बड्या लोकांना कोरोनाची लागण

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : देशातील मोठ मोठ्या व्यक्तिंना कोरोनाची लागण वेगानं होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही तासांतच अजित पवारांनाही (Ajit Pawar) कोरोना झाल्याचं निदान झालं.

दरम्यानच्या काळात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI) यांनाही कोरोना झाला. आणि आता या यादीत आणखी नाव जोडलं गेलंय. केंद्रीय टेक्स्टटाईल मंत्री आणि क्योंकी सास भी कभी बहू थी फेम स्मृती इराणी (Smriti Z Irani) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.

गोव्यात परिस्थिती सुधारतेय

गोव्यात कोरोनाचा रिकवरी रेट 93 टक्क्याच्या पुढे गेलाय. दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढतेय. नव्या रुग्णांची संख्या ही तुलनेने कमी आहे. मात्र महाराष्ट्रातील स्थिती काहीही चिंताजनक असल्याचं आकडेवारी सांगतेय. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. अशातच सामान्य माणसांपासून व्हीव्हीआयपी लोकांपर्यंत सगळ्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळतंय.

राजकीय वर्तुळात कोरोना

स्मृती इराणींना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. याआधी अमित शहांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले. दरम्यान, आता राजकीय वर्तुळामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल चालला असल्याचं एकूण घडामोडींवर दिसून येतंय.

हेही वाचा –

महाग कांद्यांची चिंता सोडा! रेशनकार्डवर मिळणार तीन किलो कांदे

एsss शाबास! आरोग्य सेतू ऍप कुणी बनवला हे कुणालाच माहिती नाही

पर्यटन धोरणावरुन लोबो-आजगावकर आमने-सामने

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!