दिपेश परब यांना ‘सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान

'सिंधुदुर्ग लाईव्ह'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार सिंधुदुर्गनगरी इथं दिमाखात प्रदान करण्यात आले. यावेळी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे करसपाँँडंट दिपेश परब यांना यावर्षीचा सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.

जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, जेष्ठ विधीज्ञ अँँड. भणगे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, जि. प. सदस्य अंकुश जाधव, ओरोस सरपंच प्रीती देसाई, पंचायत समिती सदस्य सौ. वालावलकर, जिल्हा माहिती अधिकारी सय्यद, जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, माधवराम कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा पत्रकार संघ व सिंधुदुर्ग मुख्यालय पत्रकार संघाचे सर्व सदस्य व जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन हा सन्मान करण्यात आला.

जिल्हा पत्रकार संघामार्फत दिला गेलेला हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. पुढील काळात पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिक व पारदर्शी पत्रकारिता करण्याचा मी प्रयत्न करेन, असं मनोगत यावेळी दिपेश परब यांनी व्यक्त केलं.

उपस्थित मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी आदर्श पत्रकार म्हणून संदीप गावडे, जेष्ठ पत्रकार म्हणून महादेव परांजपे, उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार – दिनेश साटम, उत्कृष्ट छायाचित्रकार-अनिकेत उचले, जेष्ठ पत्रकार कै. अरविंद शिरसाट स्मृती विशेष पुरस्कार तेजस देसाई यांना देऊन गौरविण्यात आलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!