खूशखबर! जानेवारीपासून सिंधुदुर्गातील विमानतळावरुन उड्डाणं सुरु होणार

चिपी विमानतळासंदर्भातली महत्त्वाची अपडेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कोकणात विमानतळ कधी सुरु होणार, याचं उत्तर अखेर मिळालंय. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं बांधकाम पूर्ण झालंय. नव्या वर्षापासून विमानांची उड्डाणं सुरु होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येते आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप एस. पुरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग विमानतळावरुन जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विमान उड्डाणं सुरु होणार असल्याचं हरदीप यांनी म्हटलंय.

सुरेश प्रभूंना पत्र

सुरेश प्रभू यांना लिहिलेल्या ताज्या पत्रात पुरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डीजीसीएसच्या पथकानं या विमानतळाची पाहणीही केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याप्रमाणे आता विमानतळाला परवाना दिला जाणार आहे. एटीसी मनोरा आणि हवामानविषयक माहिती निश्चित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संयंत्राची तात्काळ उभारणी करण्याचे निर्देश डीजीसीएच्या पथकाने विमानतळ उभारणी करणाऱ्या कंपनीला दिलेल्या आहेत.

चिपी विमानतळाच्या उभारणीचे काम आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायवेट लिमिटेड कंपनीकडे देण्यात आलेलं आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा कंपनीस जानेवारीपर्यंत पूर्ण करावयाच्या आहेत. अलायन्स एअर या कंपनीला उड्डाणाची परवानगी देण्यात आली असल्याचं पुरी यांनी पत्रात म्हटलं. चिपी येथील सर्व उड्डाणे आरसीएस उड्डाण योजनेनुसार होतील. सुरेश प्रभू विमान वाहतूक मंत्री होते, तेव्हा त्यांनी या विमानतळासाठी प्रयत्न केले होते. सिंधुदुर्गातून लवकरात लवकर विमान उड्डाणे सुरू व्हावीत, यासाठी ते आजही प्रयत्नशील आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!