गोव्यापासून 450 किमीवर आढळलेल्या 22 किलोच्या घोळ माशाला लाखोंची बोली

तब्बल 2.61 लाख रुपयांत विकला गेला मासा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्यापासून 450 किमी अंतरावर आहे श्रीवर्धन. महाराष्ट्रातील श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेला एक मासा भाव खाऊन गेलाय. तब्बल लाखो रुपयांची बोली या माशाला लागली आहे. थोडी थोडकी नाही, तर तब्बल 2 लाखापेक्षा जास्त रुपयांमध्ये हा मासा विकला गेलाय.

कोणता मासा?

श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर घोळ मासा आढळून आला होता. या माशाचं वजन होतं तब्बल 22 किलो. घोळ हा मासा कोकण किनारपट्टीवर क्वचितच सापडत असल्याने त्याला चांगलीच मागणी आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदरावर मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात हा मासा सापडला. २२ किलो वजनाचा घोळ मासा सापडल्यानं मच्छिमार रातोरात लखपती झालेत. घोळ माशाला लिलावात तब्बल २ लाख ६१ हजार रुपयांना विक्री करण्यात आली.

कोण झालं लखपती?

जीवना बंदरावरील मच्छिमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व नितीन पाटील हे समुद्रात मासेमारीसाठी गेले असता जाळी लावून बसले होते. त्यावेळ जाळ्यात मोठा मासा अडकल्याचं त्यांच्या लक्षात आले. हा मासा सुटण्यासाठी धडपड करत होता. ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने जाळी वर ओढली. जाळीसोबत माश्याला किनाऱ्यावर घेऊन आले.

हेही वाचा – चापोली धरणात सापडला 25 किलोचा मासा !

जाळीत भला मोठा घोळ मासा अडकल्याचे त्यांना दिसून आलं. किनाऱ्यावर झालेल्या लिलावात स्थानिक व्यापाऱ्यांनी माशाला तब्बल २ लाख ६१ हजारांची बोली लावली आणि हा मासा खरेदी केला. त्यामुळे चारही मच्छीमार मालामाल झाले आहेत.

घोळ हा मासा कोकण किनारपट्टीवर क्वचितच सापडतो. चविष्ट आणि गुणकारी असल्याने त्याला प्रचंड मोठी मागणीदेखील असते. शिवाय घोळ माशाचे जठर आणि फुफ्फुस आदी अवयवांचा वापर शल्यचिकित्सेसाठी लागणारे धागे बनविण्यासाठी केला जात असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हा मासा किनाऱ्या लगतच्या परीसरात आढळून येतो. या माशाला चांगलीच मागणी असल्याच मच्छीमारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – कामाची बातमी! 5, 10 आणि 100च्या नोटांबाबत लवकरच मोठा निर्णय

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!