ट्रकने 2 विद्यार्थ्यांना चिरडलं, पलटी झाल्यानंतरही लांबपर्यंत घसरत गेला

हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील घटना; गुरुवारी सकाळी घडला भीषण अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण ट्रक अपघातात घडला. या अपघातात दोन विद्यार्थी आणि एक दुकानदार जखमी झाले आहेत. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे.

ट्रकने दोन विद्यार्थ्यांना अत्यंत वाईटपणे चिरडलं

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, या ट्रकने दोन विद्यार्थ्यांना अत्यंत वाईटपणे चिरडलं. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत जाणारे दोन विद्यार्थी या अपघातात जबर जखमी झाले आहेत. होशियारपूर येथून फ्लोर टाइल्स घेऊन हा ट्रक जात होता. यादरम्यान वेगावर नियंत्रण न राहिल्याने रस्तावर पलटी झाला. ट्रकची गती जास्त असल्याकारणाने पलटी झाल्यानंतरही तो चालत होता. यादरम्यान दुकानाचं काऊंटर तोडून दुकानदाराच्या अंगावर ट्रक आला. यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन विद्यार्थ्यांनाही ट्रकने चिरडलं. यानंतर शेजारील शाळेच्या मैदानात जाऊ ट्रक थांबला.

अन्यथा मोठा अनर्थ झाला असता

कोरोना काळात प्रार्थना सभांवर बंदी असल्याने विद्यार्थी मैदानात नव्हते, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या अपघातात जखमी विद्यार्थ्यांना सिव्हील रुग्णालयात प्राथमिक उपचार दिले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना होशियारपूर येथे नेण्यात आलं.

या अपघातग्रस्त ठिकाणात आतापर्यंत अनेक घटना

शाळेच्या शेजारी असलेल्या या अपघातग्रस्त ठिकाणात आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. येथील आमदारांनी यावर उपाययोजना करावी अशी मागणीही केली जात आहे. मात्र अद्याप कोणतंही पाऊल उचलण्यात आलेलं नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!